ETV Bharat / state

हिंगोलीत वादळी वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस; आंबा, हळदीचे नुकसान - वातावरण

हिंगोलीत अवकाळी पाऊस पडल्यामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सध्या हळद शिजवण्याचा मोसम सुरू असून तापत्या उन्हात शेतकऱ्यांनी हळद टाकली होती. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकून टाकण्यासाठी शेतकरी एकच धावपळ करीत होते.

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडका
author img

By

Published : Apr 5, 2019, 12:22 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात ३ ते ४ दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. ४२ अंशावर तापमान पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, गुरूवारी अचानक हिंगोली जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने एकच धांदल उडाली. अचानक हजेरी लावलेल्या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच विविध गावात प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांची देखील एकच धांदल उडाली.

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडका

हिंगोली जिल्ह्यात ३-४ दिवसापासून तापमानाचा पारा वाढला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची एकच घाई उडाली. काही भागात झालेल्या गारपिटीमुळे आंबा, हळद, गहू, आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नव्हे तर सध्या हळद शिजवण्याचा मोसम सुरू असून तापत्या उन्हात शेतकऱ्यांनी हळद टाकली होती. अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकून टाकण्यासाठी शेतकरी एकच धावपळ करीत होते. तर कडोळी येथे रमतेराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त टाकलेला मंडप सुसाट वार्‍यामुळे उडून गेला.

या परिसरात झाला पाऊस

कडोळी, गोरेगाव, सवना, ब्राह्मणवाडा, सिरसम, मळहीवरा, या भागात गारपीटसह पाऊस तर हिंगोली या भागात सुसाट वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत या भागात सुसाट वारे सुरू होते. गुरूवारी सकाळपासूनच उष्णतेची लाट होती. मात्र, दुपारून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा जाणवत होता. तर पावसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात गारवा पसरला.

Intro:हिंगोली जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली होती. ४२ अंशावर तापमान पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र आज अचानक हिंगोली जिल्ह्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह गारपीट झाल्याने जिल्ह्यातील एकच धांदल उडाली. अचानक हजेरी लावलेल्या पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच विविध गावात प्रचारासाठी गेलेल्या उमेदवारांची देखील एकच धांदल उडाली.

Body:हिंगोली जिल्ह्यात दोन-तीन दिवसापासून तापमानाचा पारा वाढला होता, आणि आज अचानक अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यांची एकच घाई उडाली. काही भागात झालेल्या गारपिटीमुळे आंबा हळद, गहू, आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एवढेच नव्हे तर सध्या हळद शिजवण्याचा मोसम सुरू असून, तापत्या ऊन्हात शेतकऱ्यांनी हळद टाकली होती. अचानक आलेल्या पावसामुळे हळद झाकून टाकण्यासाठी शेतकरी एकच धावपळ करीत होते. तर कडोळी येथे रमतेराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त टाकलेला मंडप सुसाट वार्‍यामुळे उडून गेला.

Conclusion:या परिसरात झाला पाऊस कडोळी, गोरेगाव, सवना, ब्राह्मणवाडा, सिरसम, मळहीवरा, या भागात गारपीटसह पाऊस तर हिंगोली, या भागात सुसाट वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कळमनुरी, आखाडा बाळापूर, वसमत या भागात सुसाट वारे सुरू होते. आज सकाळ पासूनच उष्णतेची लाट होती, मात्र दुपारून वातावरण बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा जाणवत होता. तर पावसाच्या सरी कोसळल्या नंतर वातावरणात गारवा पसरला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.