हिंगोली - खरोखरच महिलेने जर मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. औरंगाबादमध्ये पतीने सोडून दिल्यानंतर तो पती परत मिळावा यासाठी औरंगाबाद येथे एका पत्नीने उपोषण सुरू केले होते, पण हिंगोलीतली ही महिला पतीने सोडून दिल्यानंतर त्याच्याकडे परत तर गेलीच नाही. मात्र, आईवर भार न होता पुरुषाला ही लाजवेल अशी शेतीसह सर्वच कामे करून करत आहे.
वंदना धामणे रा(. आजेगाव, ता. सेनगाव) असे या धाडसी महिलेच नाव आहे. घरची परिस्थिती बेताचीच पण अशाच अवस्थेत आई-वडिलानी वंदना यांचे विदर्भातील एका खेडेगावातील युवकाशी लग्न लावून दिले. एक दोन वर्ष संसार सुरळीत चालला. प्रेमाच्या वेलीला मुलाच्या रूपात एक फुल ही लागले. मात्र, कुणाची तरी चांगल्या संसाराला नजर लागली अन दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. वंदना माहेरी निघून अली. एक दोन वर्ष नवऱ्याच्या विरहात ढकलले, यानंतर आजारपणात वडिलांचा मृत्यू झाला, अन दिवसेंदिवस आईचा ही आजार वाढत गेला. त्या अंथरुणाला खिळून बसल्या, सर्वच दुःख वंदनावर येऊन ठेपले. दु:खाची संख्या बघता काहीकाळ वंदना गोंधळून गेल्या. मात्र, स्वतःलाच सावरत घरची सर्व जबाबदारी स्वीकारली. घरची कामे करत शेतातील ही कामे वंदना करू लागल्या. सुरुवातीला शेताची कामे अवघड जात होती. मात्र, नंतर सर्वच कामे अंगवळणी पडली. आता गावातून बैल गाडी जुंपून शेताकडे घेऊण जाणे, शेतात वखर, नांगर चालवणे सुरुवातीला ही सर्व कामे करण्यासाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागला. अनेक जण मदतीसाठी धावून ही आले, आता मात्र, वंदना सर्व कामे स्वतः च करतात. ते ही कुणाचा ही आधार न घेता.
एखाद्या पुरुषाला ही लाजवेल, असे या महिलेचे काम आहे. या महिलेच काम बघून इतर ही महिलांना ऊर्जा मिळत आहे. वंदना यांना भाऊ अन् वडील नसल्याने, आईला सांभाळण्याची जबाबदारी तिच्याकडेच आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून एखाद्या सालगड्या सारखी आईची शेती सांभाळत आहे. गावामधून गाडीबैल हाकत नेण्यापासून ते शेतातील सर्वच कामे वंदना स्वतः करतात. सध्या शेतात हळद, गहू, ज्वारी, तूर अशी रबीची पिके आहेत. मुलगा ही दहावीला आहे, तो देखील कधी मधी आईला शेती कामात मदत करतोय. मात्र, वंदनाचे हे धाडसी काम पाहुन इतर हू महिलांना नक्की प्रेरणा मिळतेय. महिलांनी कधीही परिस्थितीमुळे खचून न जाता त्या परिस्थितीचा सामना केल्यास निश्चितच पदरामध्ये यश पडते अन जीवन सुखमय होते. हेच दाखवून दिलंय वंदनाच्या या जिद्दीने. तिच्या या जिद्दीने शेतीमधून उत्पन्न काढण्याचा मार्ग निघाला आहे.