हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुस्लिम बांधवांसह आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे औंढा नागनाथ येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले. सीएए हा कायदा घटना विरोधी आणि देशविरोधी असून तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
हेही वाचा... भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे; केंद्र-राज्य आमने सामने
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्याचे आव्हान केले होते. हा कायदा लोकशाही विरोधी आणि राज्यघटनेच्या विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले होते. जाती धर्मात फूट पाडणारा हा कायदा देशात वर्णव्यवस्था आणणारा आहे, अशी टीका करण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तत्काळ रद्द करावा, या मागणीसाठी शनिवारी औंढा नागनाथ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा... कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे देणे घटनाबाह्य; गृहमंत्री अनिल देशमुखांचे वक्तव्य
हा रस्तारोको तब्बल एक तास करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. सीएए, एनसीआर, एनपीआर हे कायदे सरकारने त्वरित रद्द करावे. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.