ETV Bharat / state

हिंगोली सोयाबीनचे उभे पीक पाण्यात; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - rain news hingoli

सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस रब्बीसाठी चांगला आहे. मात्र, खरिपाचे यात अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसापासून सोयाबीन काढणीला सुरुवात केली. मात्र, अचानक आलेल्या या परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे

हिंगोली सोयाबीनचे उभे पीक पाण्यात
author img

By

Published : Oct 22, 2019, 1:02 PM IST

हिंगोली - सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हजेरी लावलेल्या पावसाने सोयाबीनची पुरती वाट लावली आहे. अजूनही सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे. मात्र, सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यंदाच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतला आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा शिवारात पावसाने हजेरी लावल्याने उभे सोयाबीन पाण्यात बुडल्याने या भागातील शेकडो हेक्टरचे नुकसान झाले आहे.

हिंगोली सोयाबीनचे उभे पीक पाण्यात

हेही वाचा- इम्रान खान त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत - बिलावल भुत्तो

सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस रब्बीसाठी चांगला आहे. मात्र, खरिपाचे यात अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसापासून सोयाबीन काढणीला सुरुवात केली. मात्र, अचानक आलेल्या या परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे. पावसाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी कापून टाकलेल्या सोयाबीनची सुडी लावली. मात्र, अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने सुडी देखील उघडी करता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे.

यंदा पावसाने अधून-मधून हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके बर्‍यापैकी होती. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार होती. मात्र, परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. सध्या शेतकरी कापणी केलेली सोयाबीन मळणी यंत्रातून काढून घेण्यासाठी घाई करत आहेत. तर ज्या भागांमध्ये सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे तेथे सोयाबीनच्या शेंगांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच साखरा येथील तुकाराम निरगुडे यांच्या घराचे पावसाने माळवद कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.

Intro:

हिंगोली- सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास हजेरी लावलेल्या पावसाने सोयाबीनची पुरती वाट लावलीय. अजूनही सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे. मात्र सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यंदाच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतलाय. सेनगाव तालुक्यातील साखरा शिवारात पावसाने हजेरी लावल्याने उभे सोयाबीन पाण्यात बुडल्याने या भागातील शेकडो हेक्टर चे नुकसान झालेय.

Body:सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. हा पाऊस रबीसाठी चागला असला तरी ही खरिपाचे मात्र अतोनात नुकसान करत आहे. शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसापासून सोयाबीन काढणी ला सुरुवात केली मात्र अचानक आलेल्या या परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान केले आहे पावसाचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी कापून टाकल्या सोयाबीनची सुडी लावली मात्र अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने सुडी देखील उघडी करता येत नसल्याचे भयंकर चित्र आहे. यंदा पावसाने अधून मधून हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके बर्‍यापैकी होती. Conclusion:त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार होतीच मात्र परतीच्या पावसाने सोयाबीनचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वरही पाणीच फिरल्या गत झाले आहे. सध्या शेतकरी कापणी केलेली सोयाबीन मळणी यंत्रातून काढून घेण्यासाठी एकच घाई करत आहेत. तर ज्या भागांमध्ये सोयाबीन मध्ये पाणी शिरलेय तेथे सोयाबीनच्या शेंगांचे अतोनात नुकसान झालेय. तसेच साखरा येथील तुकाराम निरगुडे यांचे माळवद कोसळलेय . सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.