ETV Bharat / state

शेती ते थेट ग्राहक; पपई उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा - हिंगोली पपई उत्पादन

सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा चांगलाच हैराण झालेला आहे. अशा भेदरलेल्या परिस्थिती स्वतःला धीर देऊन अनेक शेतकरी शेतात राबत आहेत. अशाच एका पपई उत्पादक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल न होता 'शेती ते थेट ग्राहक' पपई विक्री केल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

hingoli payaya farming
शेती ते थेट ग्राहक; पपई उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा
author img

By

Published : Dec 19, 2020, 5:55 PM IST

हिंगोली - सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हा चांगलाच हैराण झालेला आहे. अशा भेदरलेल्या परिस्थिती स्वतःला धीर देऊन अनेक शेतकरी शेतात राबत आहेत. अशाच एका पपई उत्पादक शेतकऱ्याने परिस्थिती समोर हतबल न होता 'शेती ते थेट ग्राहक' पपई विक्री केल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आज हा शेतकरी आपल्या कुटुंबाचा गाडा अगदी सुरळीत चालवत आहे.

शेती ते थेट ग्राहक; पपई उत्पादक शेतकऱ्यांची यशोगाथा
सेनगावच्या संतोष नागरे या शेतकऱ्याने हे शक्य केलंय. नागरे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. ते नेहमीच शेतात वेगवेगळे पिके घेतात. तर यंदा त्यांनी तैवान 786 जातीच्या पपईची लावगड केली आहे. जवळपास एक हजार झाडे लावली आहेत. त्यांनी योग्य पध्दतीने केलेल्या पाण्याच्या नियोजनामुळे पपईचीवाढ ही चांगल्या प्रकारे झाली असून, फळधारणा ही उत्कृष्ट आहे. आज घडीला प्रत्येक पपईला 30 ते 40 फळ लागल्याने, पपई ही डौलात उभी आहे.
hingoli payaya farming
तैवान 786 जातीच्या पपईची लावगड केली आहे.

मात्र नागरे व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुचाकीवर सहा कॅरेट बांधून त्यामध्ये पपई ठेवत गावोगावी जाऊन थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. 30 ते 40 प्रति किलो भाव मिळत असल्याने, यातून नागरे यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. व्यापाऱ्यांना एक ठोक पपईची विक्री केली असती तर दहा ते पंधराच्या वर भाव मिळाला नसता, मात्र शेत ते ग्राहक हा फंडा वापरल्याने, यश मिळत असल्याचे नागरे सांगतात. यासाठी त्यांना घरातील मंडळी पपई तोडण्यासाठी मदत करतात. त्यामुळे मजुरांचा खर्च वाचून यातून उत्पन्नात भर पडण्यास मदत मिळते.

पावसाने घातला होता धुमाकूळ

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात नागरे यांची पपई सापडली होती. यामुळे ते चांगलेच गोंधळून गेले होते. मात्र घरच्यांनी त्यांना धीर दिला, सर्वांनीच एकमेकांना धीर देण्याचं काम केल्याने आज पपईचं पीक पुन्हा उभी राहण्यास मदत मिळाली. उभ्या राहिलेल्या बागेचे योग्य पद्धतीने संरक्षण केल्याने त्याचे चीज झाल्याचे नागरे सांगतात.

hingoli payaya farming
नागरे व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करण्यापेक्षा दुचाकीवर सहा कॅरेट बांधून त्यामध्ये पपई ठेवत गावोगावी जाऊन थेट ग्राहकांना विक्री करत आहेत.
एक लाखापर्यंत झाला भांडवली खर्चहवापाण्याच्या संकटातून पपईचे पीक वाचल्यानंतर, ते जगवण्यासाठी शेतकरी नागरे यांनी खूप परिश्रम घेतले. आतापर्यंत एक लाखापर्यंत खर्च झाला आहे. सर्व एकत्रितपणे परिश्रम घेत असल्याने, अन थेट ग्राहकांपर्यंत पपई पोहोचवल्याने आतापर्यंत दीड लाख रुपयांच उत्पन्न मिळाले आहे. तर अजूनही दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नागरे यांना आहे.संकटाला न घाबरता केले जेवणशेतकऱ्यांनी जर मनात आणलं तर काही ही अशक्य नाही. हेच दाखवून दिले आहे. पपई उत्पादक शेतकरी नागरे यांनी निसर्गाच्या संकटात हिंमत न हरता, पपई लावडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. शेतकऱ्यांनी शेती करत असताना कोणत्याही संकटाला घाबरून जाऊ नये, संकटे ही आपली परिक्षा घेण्यासाठी येत असतात. न घाबरता चांगले काम करत राहायचे. यश हे आपोआपच मिळते. असा सल्ला नागरे हे शेतकऱ्यांना देतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.