हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबत नाहीये, राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या ( soldier committed Suicide in hingoli ) केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. दिनेश बाळासाहेब मूलगीर असे मयत जवानाचे नाव आहे. आत्महत्यचे कारण अद्याप कळालेले नाही.
स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या -
दिनेश यांची हिंगोली येथील राज्य राखीव बल गट क्रमांक 12 मध्ये नेमणूक होती. ते गडचिरोलीतील राजाराम खंडाला येथे कर्तव्य बजाव होते. मागील पाच दिवसापूर्वी ते सुट्टीवर गावी परतले होते. आज पहाटे साडे नऊच्या सुमारास त्यांचा मृतदेह स्वतःच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येचे कारण अजून समजले नाही. मात्र गडचिरोली येथून सुट्टीवर आलेल्या जवानाने अचानक आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यापूर्वी ही एका जवानाने हिंगोलीत आत्महत्या केली होती.
जवानाने आत्महत्याने जिल्ह्यात एकच खळबळ -
जवानाने आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शेवविच्छेदनासाठी बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे. या प्रकरणाची कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्यातून मिळाली. त्याच्या पश्चाताप आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
हेही वाचा - हिंगोलीत जवानाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट