हिंगोली- जिल्ह्यातील एका 21 वर्षाच्या युवकाचा निमोनिया व श्वसनाच्या अजाराने मृत्यू झाला होता. यामुळे त्याच्या कुटुंबातील आठ जणांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अन्य दोघांचे अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत 37 रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णलायात कोरोनाची लागण झालेला एक रुग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यात पहिला पॉझिटिव्ह सापडल्यानंतर प्रशासनाने गतीने पावले उचलण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्यास सुरुवात झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या 7 कोरोना संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन रुग्णांचे अहवाल औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
'त्या' आठ जणांपैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर दोघांचे प्रलंबित - hingoli corona news
जिल्ह्यातील एका 21 वर्षाच्या युवकाचा निमोनिया व श्वसनाच्या अजाराने मृत्यू झाला होता. यामुळे त्याच्या कुटुंबातील आठ जणांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अन्य दोघांचे अद्याप प्रलंबित आहेत.