ETV Bharat / state

तोडणीला येऊनही झेंडूला एक फुल लागेना; सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना फटका - शेतकऱ्यांची फसवणूक

सध्या कोणत्याही सण समारंभात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हीच संधी साधून, हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, या आशेने पिकाला लहानाचे मोठे केले. वेळेच्या वेळी खत-पाणी देऊन झेंडू फुला योग्य झाला. तरीही झेंडूला फुलेच आली नाहीत.

झेंडूच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक
author img

By

Published : Sep 21, 2019, 6:18 PM IST

हिंगोली - जिल्ह्यामध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र, कपाशीच्या बियाण्यामध्ये कंपनीने शेतकऱ्याला फलवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या झेंडूकडे आपला मोर्चा वळविला. परंतु त्यामध्येही कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मोठ्या आशेने लागवड केलेल्या झेंडूला फुलेच लागली नसल्याने शेतकऱ्यांनी तहसिलदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

झेंडूच्या बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक

हेही वाचा - हिंगोलीतील कयाधु नदी दुसऱ्यांदा 'खळखळली', नदीचे रूप पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

सध्या कोणत्याही सण समारंभात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हीच संधी साधून, हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, या आशेने पिकाला लहानाचे मोठे केले. वेळेच्या वेळी खत- पाणी देऊन झेंडू फुला योग्य झाला. तरीही झेंडूला फुलेच आली नाहीत. एवढ्या कालावधीतच झेंडूच्या फुलांची विक्री केली जायची. मात्र, यंदाची परिस्थिती उलट आहे. फुले लागण्यायोग्य झेंडूची वाढ झाली तरीही त्याला फुलेच लागली नाहीत. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सेनगाव परिसरात 500 हेक्टरवर झेंडूची लावगड करण्यात आली आहे.

हेही वाचा - पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

दसरा आणि दिवाळीासाठी झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, फुलेच आली नसल्याने शेतकरी हवाल-दिल झाला आहे. सेनगाव भागातील झेंडू उत्पादकांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. कपाशी पाठोपाठ आता झेंडू मध्येही फसवणूक झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Intro:
ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकरी हवालदिल

हिंगोली- जिल्ह्यामध्ये हळदी पाठोपाठ कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली होती मात्र कपाशीमध्ये ही कंपनीने शेतकऱ्याला गंडविले शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या झेंडू कडे आपला मोर्चा वळविला मात्र त्याही पिकात कंपनीने सोडले नाही आज घडीला मोठ्या आशेने लागवड केलेल्या झेंडूला फुलेच लागली नसल्याने कंपनीकडून आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले त्यामुळे लागलीच शेतकऱ्याने तहसिलदाराकडे धाव घेऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली.

Body:सध्या कोणत्याही सण समारंभात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहेे. हीच संधी साधून, हिंगोली जिल्ह्यांमध्ये याहीवर्षी हजारो हेक्टरवर शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केलीय. पीक आशेने लहानाचे मोठे केले, वेळेच्या वेळी खत- पाणी देऊन झेंडू फुला योग्य झाला. तरीही झेंडूला फ़ुलेच लागली नाहीत. एवढ्या कालावधीतच झेंडूच्या फुलांतुन अद्यापपर्यंत हजारो रुपयाची फुले विक्री केली जायची. मात्र यंदाची परिस्थिती उलट आहे. फुले लागण्या योग्य झेंडूची वाढ झाली असली तरीही त्याला फुलेच लागली नसल्याने, सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सेनगाव परिसरात पाचशे हेक्टरवर जा झेंडूची लावंगड केलीय. जीवाचे रान करून झेंडूची सोय केली. वाढ ही झाली मात्र
फुलेच न लागण्याने शेतकरी चांगलेच गोंधळून गेलेत. वास्तविक पाहता झेंडू हिरवागार झाला आहे. ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर झेंडूला फुलेच न लागल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दसरा अन दिवाळी सण समारंभासाठी फुले येतात. मात्र फुलेच आलेली नसल्याने, आपली कंपनीकडून फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. झेंडू उत्पादकांनी जवळपास फुल शेती मध्ये लाखों रुपये गुंतवणूक केले आहेत. Conclusion:आत हे नुकसान कस भरून निघेल याच विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. सेनगाव भागातील झेंडू उत्पादकांनी नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. कपाशी पाठोपाठ आता झेंडू मध्ये ही फसवणूक झाल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

बाईट -

१ प्रल्हाद ढेगळे काहकार बु. सेनगाव, हिंगोली
(पांढरे शर्ट )

२)भागवत ढेंगळे ( गुलाबी कलर शर्ट)

३)विजय डोखळे ( पिवळा शर्ट )

४) संजय डोईफोडे ( कपाळावर पिवळा गंध )
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.