ETV Bharat / state

आषाढी एकादशी : संत नामदेवांचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन, नरसीतील भक्तांची भावना

महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर असलेल्या नरसी नामदेव येथील नामदेवांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली.

संत नामदेवाच्या मंदिरातील नामदेवांची मूर्ती
author img

By

Published : Jul 12, 2019, 1:16 PM IST

हिंगोली - आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने नरसी नामदेव येथील भूमीत भाविकांनी संत नामदेवांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. संत नामदेवाचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार होतो, असे भाविक सांगतात. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ते वारकरी संत नामदेवांच्या पावन भूमीत येऊन दर्शन घेतात.

वारी विशेष : संत नामदेवांचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार, भक्तांची भावना

महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर असलेल्या नरसी येथील संत नामदेवांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली. विशेष म्हणजे भाविक मंदिर परिसरात गुरुवारपासून दाखल झालेले आहेत. भाविकांच्या गर्दीने नरसी नामदेव मंदिर परिसर पूर्णत: दुमदुमूला आहे. नामदेवांच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला नामदेवांचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा केल्या आहेत. शासकीय पूजेनंतर दर्शनाला सुरुवात झाली आहे.

आज मंदिर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मदतीसाठी मंदिर संस्थानकडून स्वयंसेवकांची करण्यात आली आहे. येथे पाच पोलीस अधिकारी, ७० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

तर औंढा नागनाथ येथील गोकर्ण मंदिर परिसरातही आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे. शिवाय या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे आणि संत नामदेवांचे मंदिर आहे. या मंदिरात पहाटे साडे पाच वाजता महापूजा झाली आणि त्यांनतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

Intro:आषाढी एकादशी हा एक दिवस हिंगोली करांसाठी पर्वणीच. संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी नामदेव येथील भूमीत आज भाविकांनी नामदेवांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केलीय. जे भाविक आषाढी एकादशी ला पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, असे भाविक या संत नामदेवाच्या पावन भूमीत येऊन नामदेवाचे दर्शन घेतात संत नामदेवाचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार होतोय असे भाविक भक्तीमध्ये तल्लीन होऊन सांगतात.

Body: महाराष्ट्रातील प्रतिपंढरपूर असलेल्या नरसी नामदेव येथील नामदेवांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी झाली विशेष म्हणजे भाविक मंदिर परिसरात गुरुवारपासून दाखल झालेले आहेत. भाविकांच्या गर्दीने नरसी नामदेव मंदिर परिसर पूर्णता दुमदुमून गेला आहे नामदेवाच्या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेय. मंदिर परिसरात जागोजागी उभारण्यात आलेल्या दुकानाने ही एक सौंदर्य प्राप्त झाले आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था केलीय. दर्शनासाठी पहाटे पासुन भाविकांनी रांगा केल्यात. शासकीय पूजे नंतर दर्शन भाविकांच्या दर्शनास सुरुवात झालीय.

Conclusion:मंदिर परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तर मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची जराही हेळसांड न होऊ देण्यासाठी संत नामदेव मंदिर संस्थांकडून स्वयंसेवकांची ही नियुक्ती केली आहे. येथे पाच पोलीस अधिकारी, ७० कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तर औंढा नागनाथ येथील गोकर्ण मंदिर परिसरातही आषाढी एकादशी निमित्ताने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते त्यांनी देखील पहाटे दर्शनासाठी रांगा लावल्यात. औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे. शिवाय या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी चे आणि संत नामदेवांचे मंदिर आहे. या मंदिरात पहाटे साडे पाच वाजता महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले.,
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.