ETV Bharat / state

गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत; अपघातमुक्तीचा संदेश - गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र दारू पार्टीचे नियोजन केले जाते. यातून अपघाताच्या घटना वाढत आहेत. येथील खटकाळी बायपास परिसरात सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी एक ग्लास दूध व एक गुलाबाचे फूल वाहन चालकांना देत त्यांचे स्वागत केले.

hingoli news
गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत
author img

By

Published : Jan 1, 2020, 9:09 AM IST

हिंगोली - नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र दारू पार्टीचे नियोजन केले जाते. यातून अपघाताच्या घटना वाढत आहेत. येथील खटकाळी बायपास परिसरात सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी एक ग्लास दूध व एक गुलाबाचे फूल वाहनचालकांना देत त्यांचे स्वागत केले. उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि काही सामाजिक संघटनेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला होता.

गुलाबाचे फूल अन् एक ग्लास दूध देऊन हिंगोलीत केले वाहनचालकांचे स्वागत

हेही वाचा - नववर्षाचे उत्साहात स्वागत, मुंबईकरांचा जल्लोष

सरत्या वर्षाला अनेकजण दारू पार्टीचे नियोजन करत असल्याने अनेकदा अपघातांच्या घटना घडत असतात. या घटना कमी करण्याच्या पार्श्वभूमीवरच हिंगोली येथे आगळावेगळा दूध आणि फूल वाटपाचा उपक्रम राबवला आहे. व्यसनमुक्त भारत, अपघातमुक्त भारत, हा एकमेव संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत एक हजार लिटर दूध चालकांना वाटप केले आहे. विशेष म्हणजे, पहाटे पाच वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांमध्ये उपप्रादेशिक परिवहन व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरत्या वर्षाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अपघातमुक्त भारतचा संदेश हा वर्षभर अंमलात आणला तर निश्चितच अपघाताचे प्रमाण टाळण्यास मदत होईल.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फ परिसरातील वाहनांच्या पीयुसीची तपासणी देखील मोफत केली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली नांदेड रस्त्यावर बनवण्यात आलेल्या स्टेजवर अपघात टाळण्यासंदर्भात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात अनेक प्रकारची फलक लावण्यात आली आहेत.

Intro:

हिंगोली- 2020 या नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र ओल्या पार्टीचे नियोजन केलेले आहे. यातून अपघाताच्या घटना वाढत असल्याने हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि काही सामाजिक संघटनेच्यावतीने हिंगोलीतील खटकाळीं बायपास परीसरात सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी एक ग्लास दूध अन एक गुलाबाचे फुल चालकांना देत त्यांचे स्वागत केले जात आहे.

Body:सरत्या वर्षाला अनेकजण ओल्या पार्टीचे नियोजन करत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ह्या घटना कमी करण्याच्या पार्श्वभूमीवरच हिंगोली येथे आगळावेगळा दूध आणि फूल वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे व्यसन मुक्त भारत; अपघात मुक्त भारत हा एकमेव संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविणे. या उपक्रमांतर्गत 1000 लिटर दूध चालकांना वाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. या उपक्रमांमध्ये उपप्रादेशिक परिवहन व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. सरत्या वर्षाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अपघात मुक्त भारतचा संदेश हा वर्षभर आमलात आणला तर निश्चितच अपघाताचे प्रमाण टाळण्यास मदत होईल. Conclusion:एवढेच नव्हे तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसरात वाहनांच्या पीयुसीची तपासणी देखील मोफत केली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोली नांदेड रस्त्यावर बनविण्यात आलेल्या स्टेज वर अपघात टाळण्यास संदर्भात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्या संदर्भात अनेक प्रकारची फलक लावण्यात आलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.