ETV Bharat / state

दिवसा ढवळ्या पिस्तूलचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कॅशियरला लुटले, 87 हजार लंपास - गॅस एजन्सी कॅशियरला लुटले

हिंगोलीत पिस्टलचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कॅशियरला लुटले आहे. गजानन दरंगे असे या कॅशियरचे नाव आहे. तो आज सकाळी एजन्सीचे पैसे बँकेत भरायला जाताना चोरट्यांनी त्याला बंदुकीचा धाक दाखवला आणि त्याच्याजवळची पैशांची पिशवी लंपास केली. यात 87 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

hingoli
hingoli
author img

By

Published : Aug 5, 2021, 7:44 PM IST

हिंगोली - दिवसाढवळ्या वसमत येथे गॅस एजन्सीच्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कॅशियरच्या हातातील पैशाची पिशवी पळवली. ही घटना गुरूवारी (5 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तरीही सुनियोजित पद्धतीने पैसे लुटण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर लुटारूंनी दाखवलेली बंदूक ही खरोखरची होती की खोटी होती, हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. मात्र, अशा थरकाप उडवणाऱ्या घटना वसमत शहराला नव्या नाहीत. घटनेत चोरट्यांनी 87 हजार रूपयांची रोकड पळविली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

पिस्तूलचा धाक दाखवून गॅस एजन्सीच्या कॅशियरला लुटले

बंदुकीचा धाक दाखवून पैशांची पिशवी लंपास

गजानन दरंगे असे या कॅशियरचे नाव आहे. तो या एजन्सीमध्ये जमा झालेली रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी सकाळी 11 वाजता एजंशीच्या बाहेर निघाला होता. तोपर्यंत चोरटे एजन्सीपासून काही अंतरावर नजर ठेवून बसले होते. दोघेजण रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून दरंगेची बाहेर येण्याची प्रतीक्षा करत होते. दरंगे बाहेर पडताच दोघेजण दुचाकीवर आले. पाठीमागे बसलेल्या एकाने दरंगेवर पिस्टल रोखला. त्यामुळे दरंगेने हात वर केले. तेवढ्यात चोरट्यांनी हातातील रक्केची पिशवी हिसकावून पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

जिल्ह्यात खळबळ

मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. पोलीसही चोरट्यांचा शोध घेत आहेत. त्यातच आता ही घटना घडल्याने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले असले तरीही आता चोरट्यांना पोलीस केव्हा ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा शोध सुरू

पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली आहे. चोरांनी वापरलेल्या दुचाकीची बारकाईने पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक नांदेड व परभणीकडे रवाना झाले आहे.

सुनियोजित पद्धतीने रचला कट

एजन्सीचा कर्मचारी बँकेत रक्कम भरण्यासाठी केव्हा जातो? कोण कोण सोबत असतात? याची संपूर्ण माहिती घेऊन हा कट रचला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - पोलिस अधिकाऱ्यांकडून सीबीआय अधिकाऱ्यांना धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.