ETV Bharat / state

धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; हिंगोलीत रिमझिम पाऊस

author img

By

Published : Jul 6, 2019, 11:58 PM IST

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, वसमत, ओंढा व सेनगाव तालुक्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस चांगलाच लाभदायक ठरला आहे.

हिंगोलीत रिमझिम पाऊस

हिंगोली - तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस चांगलाच लाभदायक ठरला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी लावलेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीप पेरणीला गती आली आहे.

हिंगोलीत रिमझिम पाऊस

जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसाने दडी मारल्याने दुपारच्या वेळी उकाडा ही जाणवत होता. मात्र पावसाने उघड दिल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. जिल्ह्यात सर्वत्र ट्रॅक्टरच्या आधारे पेरणीचीच घाई सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. धूळ पेरणी केलेल्या शिवारात पिकाची उगवण झाली आहे. त्या पिकाला अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र शनिवारी झालेला पाऊस थोडा का होईना पण झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना धीर मिळाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, वसमत, ओंढा व सेनगाव तालुक्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. अजूनही जिल्ह्यात गतीन पेरण्या सुरू असल्या तरीही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आता मात्र निश्चितच पेरणीचा टक्का वाढला आहे. पावसाअभावी पेरणी लांबणीवर गेल्याने ती लवकर उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. मागील आठवड्यात केवळ 10 टक्केच पेरण्या झाल्याची नोंद कृषिविभागाकडे झाली होती. आता मात्र त्या वाढ झाली असण्याची शक्यता आहे.

Intro:जिल्ह्यातील तीन दिवसांच्या विश्रांती नंतर सायंकाळच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावलीय. धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस चांगलाच लाभदायक ठरत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाऊस लांबणीवर गेल्याने, शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी लावलेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीप पेरणीला गती आलीय. मागील आठवड्यात केवळ 10 टक्केच पेरण्या झाल्याची नोंद कृषिविभागाकडे झाली होती. आता मात्र वाढ झालीय.

Body:जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पावसाने दडी मारल्याने दुपारच्या वेळी उकाडा ही जाणवत होता. मात्र पावसाच्या उघडडीपीचा फायदा शेतकऱ्यांना झालाय. जिल्ह्यात जिकडे तिकडे ट्रॅक्टर च्या आधारेच पेरणीचीच घाई सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. धूळ पेरणी केलेल्या शिवारात पिकाची उगवण झालीय. त्या पिकाला अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र आज थोडा का होईना पण झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना धीर मिळालाय. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, वसमत, ओंढा, सेनगाव तालुक्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावलीय.

Conclusion:अजूनही जिल्ह्यात गतीन पेरण्या सुरू असल्या तरीही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. आता मात्र निश्चितच पेरणीचा टक्का वाढला आहे. पावसाअभावी पेरणी लांबणीवर गेल्याने ती लवकर उरकण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर चा आधार घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.