ETV Bharat / state

हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय - रस्ते अपघात

हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने एक दिवसाची विश्रांती घेतली होती. मात्र आज (गुरुवार) पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदी पत्रातील पाणीसाठ्यामध्ये अजून वाढ झालेली नाही.

हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे
author img

By

Published : Aug 1, 2019, 7:20 PM IST

हिंगोली - एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून संततधार सुरू होती. आत्तापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 26.40 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे
हिंगोली जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्याच्या पावसामुळे पिके धोक्याबाहेर निघाली आहेत. हा पाऊस पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. मात्र, बोरवेअल आणि विहिरींची पाणीपातळी अजिबात वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदी पत्रात पाणीसाठा कमी आहे. हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कयाधू नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा झालेला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात एकदाही कयाधू नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली नाही. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मात्र रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अपघाताच्याही घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Intro:जिल्ह्यात सलग पाच ते सहा दिवस पावसाने हजेरी लावली होती. तर आज एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. आता पर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 26. 40 टक्के पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातुन वाहणाऱ्या कयाधु नदी पत्रात पाणी अत्यल्प आहे. हिंगोली शहरा पासून काही अंतरावर असलेल्या कयाधु नदीत एवढं प्लास्टिक अडकलय किती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या नजरा खिळून घेत आहे. यंदाच्या पावसात एकही पूर कयाधू नदीला गेलेला नाही.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून संततधार सुरू होती आज पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावलीय. प्रशासनाकडे जरी या पावसाची नोंद होत असली तरीही हिंगोली जिल्ह्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळे पिके धोक्याबाहेर निघालीत मात्र बोर, विहिरीची पाणीपातळी अजिबात वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज दुपारनंतर पावसाने हजेरी लावली हळूहळू पावसाचा जोर वाढतच होता त्यामुळे पावसाचा आनंद घेण्याऐवजी नागरिक आसरा शोधत असल्याचे दिसून आले. हा पाऊस पिकांसाठी लाभदायक असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

Conclusion:जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मात्र रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे तर अपघाताच्या ही घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत अकोला नांदेड महामार्गावर साईड पट्टी न भरल्यामुळे वाहने पलटि होण्याचे प्रकार वाढत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.