ETV Bharat / state

पंचायत समिती कर्मचार्‍याच्या घरात निघाली धामण ; सर्वांचीच उडाली भंबेरी - सर्पमित्र

औंढा नागनाथ येथील एका पंचायत समिती कर्मचार्‍याच्या घरात धामण प्रजातीचा साप निघाल्याने सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. सापाला पकडून पंचायत समिती परिसरात आणला असता, धामण पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

पंचायत समिती कर्मचार्‍याच्या घरात निघाली 'धामण'
author img

By

Published : Aug 2, 2019, 9:15 PM IST

हिंगोली - औंढा नागनाथ येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याच्या घरात धामण निघाल्याने सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. सर्पमित्र प्रकाश मगरे यांना कळवल्यानंतर त्यांनी ताबडतोब कर्मचार्‍याच्या निवासस्थानी धाव घेतली. मगरे यांनी धामण पकडून जंगलामध्ये सोडून दिली.

पंचायत समिती कर्मचार्‍याच्या घरात निघाली 'धामण'
परभणी येथील एका खाजगी कार्यालयात एक कर्मचारी गाढ झोपेत असताना त्याच्या उशाशी एक साप आला होता. हा सर्व थरारक प्रकार त्या कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्या कर्मचाऱ्याचे डोके सापाच्या शेपटीवरही पडले होते. मात्र सुदैवाने सापाने दंश केला नाही. ही बाब सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. असाच काहीसा प्रकार औंढा नागनाथ येथील एका पंचायत समिती कर्मचार्‍याच्या घरामध्ये घडला.घरातील टीव्ही खाली साप बसल्याचे बुरुड कुटूंबियांच्या लक्षात आले. घरात साप असल्याचे पाहून सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बचावासाठी सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. सर्पमित्र प्रकाश मगरे यांच्याशी संपर्क साधला असता, मगरे तत्काळ बुरुड यांच्या घरी दाखल झाले. सापाला पकडून पंचायत समिती परिसरात आणला असता, साप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही धामण असल्याचे सर्पमित्र प्रकाश मगरे यांनी सांगितले.

Intro:

हिंगोली- औंढा नागनाथ येथील पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याच्या घरात धामण निघाल्याने सर्वाचीच भंबेरी उडाली. ही बाब ताबडतोब सर्पमित्र प्रकाश मगरे यांना कळविल्यानंतर त्यांनी ताबडतोब र्मचार्‍याच्या निवासस्थानी धाव घेऊन धामण पकडली आणि तिला जंगलामध्ये सोडून दिले.
Body:परभणी येथील एका खाजगी कार्यालयात एक कर्मचारी गाढ झोपेत असताना त्याच्या उशाशी एक साप आला होता. हा सर्व थरारक प्रकार त्या कार्यालयात बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता त्या कर्मचाऱ्याचा काळ आला होता मात्र वेळ नाही एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्याचे डोके सापाच्या सेपटी वरही पडले होते. मात्र सुदैवाने सापाने दंश केला नव्हता. ही बाब सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. असाच काहीसा प्रकार औंढा नागनाथ येथील एका पंचायत समिती र्मचार्‍याच्या घरामध्ये घडला सदरील साप हा टीव्ही खाली लपून बसल्याचे कर्मचारी बुरुड यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आली. घरात साप असल्याचे पाहून सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि बचावासाठी सर्वांनी घराबाहेर धाव घेतली सर्पमित्र प्रकाश मगरे यांच्याशी संपर्क साधला असता, मगरे यांनी तात्काळ बुरुड यांच्या घरी धाव घेतली. Conclusion:अन सापाला पकडून पंचायत समिती परिसरात आणला तर हा साप पाहण्यासाठी परिसरात एकच गर्दी झाली होती.ही धामण असल्याचे सर्पमित्र प्रकाश मगरे यांनी सांगितले. मगरे यांनी साप वनविभागात सोडून देत जीवदान दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.