ETV Bharat / state

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे वाढत्या तापमानात हजेरी लावत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत असून उकाड्यापासून नागरिकांचा काही प्रमाणात बचाव होत आहे.

author img

By

Published : Jun 6, 2019, 10:23 AM IST

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

हिंगोली - जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. दोन दिवसापासून झालेल्या बदलामूळे सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन, पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसातच विद्युत वितरण कंपनीचा पुरवठा गुल होत असल्याने, जिल्हाभरातील विद्युत ग्राहकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे ग्राहक चांगलेच संतापले आहेत.

हिंगोली जिल्हात मान्सूनपूर्व पाऊसाची हजेरी

विशेष म्हणजे वाढत्या तापमानात हजेरी लावत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत असून उकाड्यापासून नागरिकांचा काही प्रमाणात बचाव होत आहे. सोमवार आणि मंगळवारी वसमत परिसरात सलग दोन दिवस झालेल्या बेमोसमी पावसामुळे नागरिकांना सर्वाधिक जास्त फटका बसला. या भागात वीज पडून एक गाय दगावली, तर एका वृद्ध महिलेच्या अंगावर टीन पत्रे पडली. बर्‍याच भागात झाडे रस्त्यावरून पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे आज दिवसभर रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्यामध्ये संबंधित विभाग तल्लीन झाला होता. रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात विजेचा कडकडाट सुरू होता. अशाच परिस्थितीत विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने, नागरिकांना अक्षरशा रात्र जागून काढण्याची वेळ येऊन ठेपली होती. हीच परिस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम असून जिल्ह्यातील कळमनुरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.

दुसऱ्या दिवशीही काही काळासाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे केवळ दोन ते तीन दिवसातच विद्युत वितरण कंपनीचा फज्जा उडाला असून नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊन ठेपली होती. सुरुवातीलाच ही परिस्थिती असेल तर अजून तर मौसम बाकीच आहे. त्यामध्ये विद्युत वितरण कंपनी काय दिवे लावणार हे यावरूनच दिसून येते.

मात्र बेमोसमी पावसाने काही का असेना शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेती मशागतीला सध्या वेग आलेल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर टंचाई परिस्थितीमध्ये महिला व पुरुषांना मजुरी मिळाल्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात बदल तर झालेलाच आहे मात्र सलग तीन दिवसापासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडत आहे. दोन दिवसापासून तर वातावरणात एवढा बदल झालाय की, सायंकाळच्या वेळेस अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन, पाऊस हजेरी लावत आहे. मात्र मान्सूनपूर्व पावसातच विद्युत वितरण कंपनीचा पुरवठा गुल होत असल्याने, जिल्हाभरातील विद्युत ग्राहकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे ग्राहक चांगलेच संतापले आहेत.

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे वाढत्या तापमानात हजेरी लावत असलेल्या, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत, असून उघडया पासून नागरिकांचा काही प्रमाणात बचाव होत आहे. सोमवार आणि मंगळवारी वसमत परिसरात सलग दोन दिवस झालेल्या बेमोसमी पावसामुळे नागरिकांना सर्वाधिक जास्त फटका बसलाय. या भागात एक वीज पडून गाय दगावली तर एका वृद्ध महिलेच्या अंगावर टीन छत्रे पडली. तर बर्‍याच भागात झाडे रस्त्यावरून पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे आज दिवसभर रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्या मध्ये संबंधित विभाग तल्लीन झाला होता. तर रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात विजेचा कडकडाट सुरू होता. अशाच परिस्थितीत विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने, नागरिकांना अक्षरशा रात्र जागून काढण्याची वेळ येऊन ठेपली होती. हीच परिस्थिती दुसऱ्या दिवशीही कायम असून जिल्ह्यातील कळमनुरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.

Conclusion:तर दुसऱ्या दिवशीही काही काळासाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे केवळ दोन ते तीन दिवसातच विद्युत वितरण कंपनीचा फज्जा उडाला असून नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊन ठेपली होती. सुरुवातीलाच ही परिस्थिती असेल तर अजून तर मौसम बाकीच आहे. त्यामध्ये विद्युत वितरण कंपनी काय दिवे लावणार हे यावरूनच दिसून येते.
मात्र बेमोसमी पावसाने काही काहोना शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेती मशागतीला सध्या वेग आलेल्या असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर टंचाई परिस्थितीमध्ये महिला व पुरुषांना मंजुरी मिळाल्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

पाऊस पडत असलेले व्हिज्युअल ftp केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.