ETV Bharat / state

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, 'प्रहार'चा हिंगोलीमध्ये रास्ता रोको - पोलीस बंदोबस्त

या रास्ता रोको मध्ये परिसरातील धार, गोजेगाव, साळणा, चिमेगाव, रुपुर, पारडी, सावळी, केळी, माथा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'प्रहार'चा हिंगोलीमध्ये रास्ता रोको
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:57 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका कळपामध्ये 150 ते 200 नीलगाय (रोहींची) संख्या असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.

'प्रहार'चा हिंगोलीमध्ये रास्ता रोको

या रास्ता रोको मध्ये परिसरातील धार, गोजेगाव, साळणा, चिमेगाव, रुपुर, पारडी, सावळी, केळी, माथा आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर, यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी तालुका वनाधिकारी केंद्रे यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. रास्ता रोकोमुळे लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. वन विभागाने लेखी आश्वासन तर दिले. मात्र, आता ते कितपत पाळले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:हिंगोली- जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा एवढा हैदोस वाढलाय की एका एका कळपामध्ये दीडशे ते दोनशे रोहीची संख्या असल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.Body:या रास्ता रोको मध्ये परिसरातील धार, गोजेगाव, साळणा, चिमेगाव, रुपुर, पारडी, सावळी, केळी, माथा अादी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी तालुका वनाधिकारी केंद्रे यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. रास्ता रोकोमुळे लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे काही काळ या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला वन विभागाने लेखी आश्वासन तर दिले मात्र आता ते कितपत पाळले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरोखरच वन्यप्राण्यांचा वन विभाग बंदोबस्त लावेल का? लावलाच तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी जीवाचे रान करून, वन्यप्राण्यांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करत आहेत. Conclusion:*

रात्रंदिवस वन्यप्राणी हाकण्यासाठी शेतामध्ये मुक्काम ठोकत आहेत. तरीही देखील शेतकऱ्यांची नजर चुकवून वन्य प्राणी हे कोवळ्या कोवळ्या पिकावर डल्ला मारतच असल्याचे भयंकर चित्र सर्वत्रच दिसून येत आहे. आजच्या रास्ता रोकोमुळे खरोखरच वन विभाग या प्राण्यांचा कसा बंदोबस्त करेल हे पाहणे मात्र औत्सुकाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.