ETV Bharat / state

महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिसाचाच अत्याचार; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार - औंढा नागनाथ

औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
author img

By

Published : Sep 18, 2019, 7:43 AM IST

हिंगोली - औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

यामुळे संबंधित महिला गर्भवती राहिली असून, नंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक प्रकारामुळे पोलीसच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

मुनीर इब्राहिम मुन्नीवाले असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मागील चार वर्षांपासून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता. तसेच आरोपी या महिलेला सतत शिवीगाळ करत असल्याची फिर्यादीत नोंद आहे.
अनेकदा महिलेने लग्नाची मागणी केल्यावर आरोपी वारंवार टाळाटाळ करून महिलेची दिशाभूल करत होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उपअधीक्षक सतीश देशमुख या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Intro:ओंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर लग्नाचे आमिष दाखवत अनेक ठिकाणी नेत बलात्कार केला. यातुन महिला गर्भवती राहिली. तर तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात केला. त्यामुळे कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. एरवी सुरक्षेसाठी धावून जाणारी खाकी हिंगोलीतील या खळबळजनक प्रकारामुळे असुरक्षित असल्याचेच समोर आलेय.

Body:मुनीर इब्राहिम मुन्नीवाले असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कर्मचारी हा फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याला मागील चार वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत होता. ज्या ज्या ठिकाणी ही महिला कर्तव्यावर असे त्या ठिकाणी जात अत्याचार करीत असे. त्यामुळे ही महिला गर्भवती राहिली. तर तिचा तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला. एवढेच नव्हे तर आरोपी पोलीस कर्मचारी हा सदरील महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ देखील करीत असे. अनेकदा महिलेने लग्नाची मागणी केली मात्र वारंवार हा पोलीस कर्मचारी टाळाटाळ करून महिलेची दिशाभूल करीत होता. त्यामुळे महिलेने सोमवारी रात्री उशिरा वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. वसमतचे उपअधीक्षक सतिष देशमुख हे घटनेचा तपास करीत आहेत.

Conclusion:हिंगोलीचे पोलीस दल अशा वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत आहे मात्र चक्क पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना असा अत्याचार करणे म्हणजे गंभीर बाब आहे. सदरील महिलाही पोलीस मुख्यालय तसेच जवळा बाजार, औंढा नागनाथ येथे कार्यरत असताना आरोपीने त्याठिकाणी जात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. जी खाकी दुसऱ्याच्या सुरक्षितेसाठी धावून जातेय. अन दुसरीकडे मात्र हिंगोलीत खाकीच असुरक्षित असेल तर ?
असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र या पोलीस प्रशासनामध्ये या प्रकाराची मोठ्या चवीने चर्चा होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.