ETV Bharat / state

मराठवाड्यात वृक्षरोपणाचे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्या गावातच योजनेला सुरुंग - divisional commissioner sunil kendrekar

कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर नंतर आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याच मूळ गावी वृक्ष लावगडीचे तीनतेरा झाले आहेत. लागवडीसाठी आणलेली रोपे एका बंद खोलीत ठेऊन आयुक्त येण्याआधीच रातोरात त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

मराठवाड्यात वृक्षरोपणाचे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्या गावातच योजनेला सुरुंग
author img

By

Published : Nov 21, 2019, 4:52 PM IST

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर नंतर आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याच मूळ गावी वृक्ष लावगडीचे तीनतेरा झाले आहेत. लागवडीसाठी आणलेली रोपे एका बंद खोलीत ठेऊन आयुक्त येण्याआधीच रातोरात त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावरून मराठवाड्यात वृक्षरोपण करण्याचे आदेश देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या गावातच संबंधित योजनेला सुरुंग लागल्याचे चित्र आहे.

यावर्षी 33 कोटी वृक्ष लावगड करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला होता. संबंधित योजनेअंतर्गत जिल्ह्यात 27 लाख वृक्षांची लावगड करण्यात आली. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयानेही या वृक्षलागवडीत सहभाग नोंदवला. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला 3 हजार 300 वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी वृक्ष लावगड केली; मात्र कळमनुरी तालुक्यातील कृष्णापुर येथील ग्रामपंचायतीने वृक्ष लावगड न करता रोपे फेकून दिल्याचे आढळले. होते.

हे प्रकरण तापल्यानंतर आता गटविकास अधिकाऱ्यांनी देखील ग्रामपंचायत निहाय वृक्ष वाटपाची संख्या अद्यावत न ठरवल्याचे समोर आले आहे. या रोपट्यांची चौकशी करण्यासाठी समिती दाखल होणार होती. अद्यापही संबंधित समिती दाखल न झाल्याने वृक्षारोपणाच्या योजनेचा फज्जा झाला आहे.

विभागीय आयुक्त भेट देणार असल्याचे समजताच एका बंद खोलीत ठेवलेल्या रोपट्यांची रातोरात विल्हेवाट लावण्यात आली. याच गावाचा कायापालट होण्यासाठी आयुक्त केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही दिल्या आहेत.

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात वृषलावगडीचा चांगलाच फज्जा उडालेला आहे. कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर नंतर आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याच मूळ गावी वृक्ष लावगडीसाठी आणलेले रोपटे एका बंद खोलीत ठेऊन आयुक्त येण्याच्या दिवशी रातोरात विल्हेवाट लावलीय. यावरुनच मराठवाडाभर वृक्षरोपणाचे आदेश देणाऱ्या आयुक्तांच्या गावातच वृक्षारोपण योजनेला सुरुंग लागल्याचे भयंकर वास्तव समोर आलंय.

Body:हिंगोली जिल्ह्यात या वर्षी 33 कोटी वृक्ष लावंगड योजनेअंतर्गत 27 लाख वृक्ष लावंगड केलीय. शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयाने ही वृक्षलागवडीसाठी सहभाग नोंदविला. एवढेच नव्हे तर प्रत्येक ग्रामपंचायतीला 3 हजर 300 वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्टे देले होते. त्यानुसार काही ग्रामपंचायतीने वृक्ष लावगड केलीही, मात्र कळमनुरी तालुक्यातील कृष्णापुर येथील ग्रामपंचायतीने वृक्ष लावंगड न करता झाडे रोपटे अस्तावेस्त फेकून दिल्याचे आढळून आले होते. हे प्रकरण चांगलेच तापले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी देखील ग्रामपंचायत निहाय वृक्ष वाटप ची संख्या अद्यावत न ठरवल्याचे ही समोर आले आहे. या रोपट्यांची चौकशी करण्यासाठी समिती दाखल होणार होते मात्र अजूनही ती समिती साखर झालेली नसतानाही पुन्हा एकदा वर्ष लागवडीचा फज्जा उडाल्याचे केंद्रा बुद्रुक येथील प्रकारातून समोर आलंय. विशेष म्हणजे मूळ गावी विभागीय आयुक्त येणार असल्याचे समजताच एका बंद खोलीत ठेवलेल्या रोपट्यांची रातोरात विल्हेवाट लावण्यात आलीय. आता याच गावाचा कायापालट व्हावा म्हणून आयुक्त केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी सूचना ही दिल्या आहेत. Conclusion:एवढेच नव्हे तर आयुक्ताच्या धास्तीने सेनगाव तहसील मध्ये रातोरात तुरीवर रोटावेटर फिरवून वृक्ष लावगड केलीय. अन आयुक्ताच्या मुळ गावात वृक्ष लावंगडीसाठी आणलेले रोपटे बंद खोलीत डांबून ठेवले अन रातोरात गायब ही केले. आता ग्रामपंचायत वर काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.