हिंगोली - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास विरोध करणाऱ्या युवकास जबर मारहाण केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील चोंढी शहापूर येथे घडली. औरंगाबाद येथे उपचारादरम्यान दारू पिण्यासाठी पैसे देण्यास विरोध करणाऱ्यास जबर मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखलखमीचा मृत्यू झाला. बालासाहेब सखाराम राठोड यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन बाजीराव राठोड (२२) असे मृताचे नाव असून, अनिल हिरामण कठाळे, हिरामण निवृत्ती कठाळे, धारबाजी हिरामण कठाळे, पंचशीला हिरामण कठाळे, सोनाली कठाळे, काशिनाथ प्रकाश कठाळे अशी आरोपीची नावे आहेत.
आरोपीने मृत गजानन यास दारू पिण्यासाठी पैसे मागण्याचा तगादा लावला होता.मात्र, गजानन पैसे देण्यास विरोध करत होता. याचा राग मनात धरून, आरोपीने 15 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, मल्हारी मुंजाजी कबले यांच्या घरासमोर विटाने व काठीने जबर मारहाण करून जखमी केले.
जखमीस तातडीने जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले. नंतर ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात अन् तेथून हिंगोली येथे हलवले, मात्र प्रकृतीत काहीही सुधारणा होत नसल्याने नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविृले. मात्र, तरीही फरक न पडल्याने, औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान 16 मे रोजी गजाननचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, पोलीस संदीप थडवे, जमादार राजेश ठाकूर, सय्यद शायद आदींनी भेट दिली. पाच आरोपी ताब्यात असून, दोन आरोपी हे फरार आहेत.