ETV Bharat / state

आधार काढण्यासाठी हिंगोलीत नागरिकांची तारांबळ; बँके बाहेर लागतात रांगा

नागरिकांची आधारकार्ड काढण्यासाठी चांगलीच धांदल उडाल्याचे सध्या दिसून येत आहे. पूर्वी महा-ई केंद्रावर मिळणारे आधार बंद करून, ते बँका किंवा पोस्टातच उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना हातची सर्व कामे सोडून आधार कार्ड काढण्यासाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे बँकेत रांगा लागत आहेत.

आधार काढण्यासाठी नागरिकांची हिंगोलीत तारांबळ
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:06 PM IST

हिंगोली - शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आधार हे सक्तीचे झाले आहे. आधार केवळ हे योजनेसाठीचा नव्हे तर शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी चांगलीच धांदल उडाल्याचे सध्या दिसून येत आहे. पूर्वी महा-ई केंद्रावर मिळणारे आधार बंद करून, ते बँका किंवा पोस्टातच उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना हातची सर्व कामे सोडून आधार कार्ड काढण्यासाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे बँकेत रांगा लागत आहेत.

आधार काढण्यासाठी नागरिकांची हिंगोलीत तारांबळ

सध्याच्या परिस्थितीत आधार मानवाचा आधार बनला आहे. आधार नाही तर काहीच नाही, अशी काहीशी सध्याची परिस्थिती झाली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ आधार शिवाय मिळतच नाही. मुख्य ओळखीचा पुरावा हा आधार असल्याने, ते काढून घेण्यासाठी नागरिक एवढे बेजार होत आहेत. 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून हिंगोली येथे ग्रामस्थ आधार कार्ड काढण्यासाठी येत आहेत. सध्या हिंगोली जिल्ह्यात आधार कार्ड हे पोस्ट ऑफिस अन् काही बँकेत काढले जात आहे. मात्र बँकेत ज्या केंद्रचालकांना आधार कार्ड काढण्याचा कंत्राट दिले आहे. ते नागरिकांना खालच्या दर्जाची वागणूक देत आहेत. या प्रकाराकडे बँक व्यवस्थापक दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील युनियन बँकेत आधार किट प्रवेश द्वाराजवळ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते आहे.

Intro:शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आधार हे सक्तीचे केले आहे. आता आधार केवळ हे योजनेसाठीचा नव्हे तर शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश देखील आधार कार्ड शिवाय दिला जात नसल्याने, पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी चांगलीच धांदल उडाल्याचे सध्या दिसून येत आहे. पूर्वी महा-ई केंद्रावर मिळणारे आधार बंद करून, ते बँका किंवा पोस्टातच उपलब्द्ध आहे. त्यामुळे पालकांना हातची सर्व कामे सोडून आधार कार्ड काढत शहर गाठावे लागत आहे. उपाशी तापाशी चिमुकले ठेवावे लागत असल्याचे सध्या भयंकर चित्र दिसून येत आहे.

Body:सध्याच्या परिस्थितीत आधार खरोखर मानवाचा आधार बनलेय. आधार नाही तर काहीच नाही, अशी काहीशी सध्याची परिस्थिती असून, शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ हा आधार शिवाय मिळतच नाही. मुख्य ओळखीचा पुरावाच हा आधार असल्याने, ते काढून घेण्यासाठी नागरिक एवढे बेजार होत आहेत की, आधार केंद्रावर आल्यानंतर तर बेजरीत पुन्हा वाढ होत आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात आधार कार्ड हे पोस्ट ऑफिस अन काही बँका मध्ये काढले जात आहे. पोस्टात तरी ठीक आहे. मात्र बँक मध्ये ज्या केंद्रचालकांना आधार कार्ड काढण्याचा कंत्राट दिलाय ते नागरिकांना एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक देत आहेत की, याला कंटाळून काही महिला दुसरीकडे धाव घेत आहेत. या प्रकाराकडे बँक व्यवस्थापक ददुर्लक्ष करीत आहेत. युनियन बँक मध्ये तर आधार किट प्रवेश द्वारावरच असल्याने, या ठिकाणी एवढी गर्दी होते की, ग्राहकांना देखील जाता येता येत नाही. शिवाय बँकेला लागून च एटीएम असल्याने त्यात देखील जाता येतं नाही. चिमुकल्यांना देखील उपाशी तापाशी पालकासोबत बँकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत बसावे लागत आहे. नवीन आधार कार्ड काढणे किंवा जुन्या मध्ये दुरुस्ती करणे यासाठी बँकेत बऱ्यापैकी गर्दी होत आहे.

Conclusion:पूर्वी हीच सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध होती मात्र प्रशासनाने ही सेवा केवळ आता राष्ट्रीय कृत बँकांमध्येच उपलब्ध करून दिली त्यामुळे ग्रामीण भागातून ग्रामस्थांना हाती कामे टाकून राष्ट्रीयीकृत बँकेत आधार कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. ही संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की त्यामुळे त्या बँकेतील सर्व रस्तेच बंद होऊन जातात. नियमित 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून हिंगोली येथे ग्रामस्थ आधार कार्ड काढण्यासाठी येतात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीमुळे ते पहाटे पाच ते सहा या वेळात बँकेसमोर हजर होऊन बँक उघडण्याची प्रतीक्षा करत असल्याचे ही चित्र दिसून येते. युनियन बँक मधील आधार केंद्र चालक तर चक्क पहाटे पाच ते सहा वाजता बोलवत असल्याचे काही महिला, पुरुष सांगत होते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामस्थांची आधार कार्ड साठी होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी पालकातून होत आहे.

या बातमीचे व्हिज्युअल ftp केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.