ETV Bharat / state

हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेवर पालकांचा बहिष्कार; शाळा दुरुस्त करण्याची मागणी - सेनगाव

जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदार शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पडक्या खोलीतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेवर पालकांचा बहिष्कार
author img

By

Published : Jun 27, 2019, 1:40 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत पाठवण्यास विरोध करीत शाळेवर बहिष्कार टाकला. तसेच सर्व पालक शाळेच्या प्रांगणात दिवसभर ताटकळत बसले होते.

हिंगोलीत जिल्हा परिषद शाळेवर पालकांचा बहिष्कार

जामदया जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदार शिक्षण विभागाकडे निवेदने सादर केली होती. मात्र, अद्यापही त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पडक्या खोलीतच शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे. त्यामुळे पालकांनी आपले पाल्य शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वजण शाळेतून मुले काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. दिवसभर शाळेत ताटकळत बसूनही या पालकांची कुणीही भेट घेतलेली नाही. त्यामुळे पालक अधिकच संतप्त झाले होते.

शिक्षण विभाग शाळा दुरुस्तीचा मुद्दा गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे शाळा दुरुस्ती होऊन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे पाल्य शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा जामदया येथील पालकांनी घेतला आहे. आता शिक्षण विभाग या पालकांच्या मागण्या पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळेची सद्यस्थितीमध्ये दुरावस्था झालीय. जनावरेही उभे राहणार नाहीत अशा शाळेत विद्यार्थ्याना ज्ञानार्जन केले जाते. यालाच विरोध करत सेनगाव तालुक्यातील जामदया येथील पालकांनी आज शाळेत आपल्या पाल्य पाठविण्यास विरोध करत. या शाळेवर बहिष्कारच टाकलाय एवढेच नव्हे तर पालक शाळेच्या प्रांगणात दिवसभर ताटकळत बसले होते. या प्रकाराने हिंगोली जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.

Body:जामदया येथील जिल्हा परिषदेची शाळा दुरुस्ती करण्या संदर्भात अनेकदा शिक्षण विभागाकडे निवेदने दिली लेखी तोंडी कळवूनही त्यावर कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने, अशा पडक्या मडक्या खोलीतच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळेच जामदया येथील पालकांनी आज आपले पाल्य शाळेमध्ये न पाठविण्याचा निर्णय सार्वजनिक रित्या घेतलाय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही आमचे सर्वच मूल शाळेतून काढणार असल्याचा निर्णयही पालकांनी घेतला आहे. दिवसभर या पालकांची कोणी भेट तर घेतली नव्हती. मात्र ही परिस्थिती जिल्ह्यातील केवळ एकाच शाळेची नाही. बहुतांश शाळा एवढ्या नादुरुस्त आहेत की जगोजागी भिंतीला तडे गेलेत, तर टिन पत्रे देखील उडून गेली आहेत. अशा शाळेत आपला जीव मुठीत ठेऊन शिक्षण घेत आहेत.

Conclusion:दुरुस्ती साठी शिक्षण विभाग गांभीर्याने घेत नसल्याने, दिवसेंदिवस शाळा नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. जोपर्यंत शाळा दुरुस्ती होऊन मिळत नाही तो पर्यंत आम्ही आमचे पाल्य शाळेत पाठविणार नसल्याचा पवित्रा जामदया येथील पालकांनी घेतला आहे. आता शिक्षण विभाग या पालकांना काय आश्वासन देणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

व्हिज्युअल ftp केले आहेत.
बातमी त वापरावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.