हिंगोली- जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही महिला मास्क न लावता तसेच फिजिकल डिस्टंस न पाळता वडाला फेरे मारत असल्याचे धक्कादायक चित्र जिल्ह्यात पहावयास मिळाले आहे. वास्तविक पाहता शासनाने कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र महिलांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. त्यातच दिवसेंदिवस रुग्णांची वाढती आकडेवारी काळजाचा ठोका वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने धार्मिक सामाजिक कार्यक्रम रद्द केलेले आहेत. मात्र, हिंगोली येथे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांना कोरोनाचा साफ विसर पडला असून, महिला वटवृक्षाच्या झाडाला विना मास्क फेरे घेत असल्याचे दिसून आले.
कोरोना पसरू नये म्हणून प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहे. मात्र नागरिकांना त्याचा विसर पडल्याचे आजच्या या प्रकारावरून दिसून येत आहे.