ETV Bharat / state

रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या रांगोळी बद्दल बातमी

हिंगोलीत रांगोळीतू छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील विद्यार्थीनी व कला शिक्षकांनी ही प्रतिमा साकारली आहे.

nine-foot-image-of-chhatrapati-shivaji-maharaj-made-from-rangoli
रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा
author img

By

Published : Feb 18, 2021, 10:30 PM IST

हिंगोली- संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. याच जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जात आहेत, अशाच परिस्थितीत कळमनुरी तालुक्यातील कवडा येथील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील विद्यार्थीनी व कला शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नऊ फुटाची प्रतिमा रांगोळीतून हुबेहूब साकारली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची नऊ फुटांची प्रतिमा

सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर हे नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कला रेखाटत चर्चेत राहतात. कोरोना काळात तर दारव्हेकर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी आगळीवेगळी कलाकृती साकारून कोरोनाचा लॉकडाऊन उपयोगात आणला होता. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष या कुटुंबाने वेधून घेतले होते. प्रत्येक सण उत्सवा दरम्यान, दारव्हेकर हे रांगोळीतुन कलाकृती सादर करीत असतात. एवढेच नव्हे तर ते टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू देखील बनवतात, उकिरड्यावर वा पडीक जमिनीत उगवणाऱ्या भोपळ्यापासून ते महिला उपयोगी पर्स, घरात शोभेच्या वस्तू बनवतात. त्यामुळे दिलीप दारव्हेकर हे आपल्या कलेने एकट्या हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी ही कला कायम ठेवण्यासाठी शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती प्रतिमा रांगोळी मधून साकारली आहे.

खरी खुरी प्रतिमा असल्याचा होतोय भास -

प्रतिमा एवढी हुबेहूब आहे की, जणू काही एखाद्या दगडाला कोरले आहे. असाच काहीसा भास रांगोळी पाहताना होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोषाखामध्ये वेगवेगळे आकर्षक रंग वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे अंगामध्ये खरोखरच कपडे परिधान केल्याचा भास या रांगोळी मधून होत आहे त्यामुळे ही रांगोळी या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या विध्यार्थीनीने केले रांगोळी काढण्यासाठी प्रयत्न -

रांगोळी काढण्यासाठी स्नेहल नरवाडे, ऐश्वर्या चक्रधारी, आरती सोनार, मोनिका नरवाडे, अश्विनी गव्हाणे, शिवरानी बॉमशेटे व कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांनी प्रयत्न केलेले आहेत. यावेळी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमीच दारव्हेकर आगळी वेगळी कलाकृती साकारत असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.