ETV Bharat / state

घरासमोर बांधकाम साहित्य टाकण्यावरून तरुणाची हत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल

घर बांधकामाचे साहित्य घरासमोर टाकले म्हणून वाद निर्माण झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महेंद्र किशन ठोके
महेंद्र किशन ठोके
author img

By

Published : Apr 8, 2021, 4:32 PM IST

हिंगोली - बांधकामासाठी आणलेले साहित्य शेजाऱ्याच्या दारात टाकल्याने तलवारीने वार करून युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

महेंद्र किशन ठोके (वय, 32 रा. हत्ता) असे मृताचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून नितीन सतिष ठोके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. महेंद्र ठोके यांच्या घरासमोर स्लॅब टाकण्यासाठी आणलेले साहित्य टाकले होते. महेंद्रने नितीनला घरासमोर बांधकाम साहित्य टाकण्यात मनाई केली होती. मात्र नितीनने याकडे दुर्लक्ष केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात महेंद्रचा मृत्यू झाला.

तलवारीने केले वार

नितीनने महेंद्र ठोकेंच्या छातीवर आणि पाठीवर वार केले. यामध्ये महेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पुंजाजी मरीबा ठोके व रमाबाई पुंजाजी ठोके यांनी देखील महेंद्र यास मारहाण केली. एवढेच नव्हे तर जमिनीवर पडलेल्या महेंद्रला वाचविण्यासाठी भाऊ राहुल किसन ठोके हा धावून आला होता. मात्र त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. जखमी महेंद्रला सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमी राहुल ठोके यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

या घटनेने हत्ता गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुल ठोके यांच्या फिर्यादीवरून नितीन सतिष ठोके, पुंजाजी मरीबा ठोके, रमाबाई पुंजाजी ठोके या तिघांविरुद्ध विविध कलमांनुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक के. एस. पाटील यांनी भेट दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.