ETV Bharat / state

'हारकर जितने वालो को बाजीगर कहते है'; हिंगोलीच्या प्रचार बैठकीत आला अनुभव - congress

सातव हे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्तीय असल्याने अन् गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे असल्यानेही सातव यांना तिकडेच लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे बोलले जाते.

author img

By

Published : Mar 31, 2019, 11:20 PM IST

हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने भाजपमधून आयात केलेला उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचार बैठकीचे आज (रविवार) हिंगोलीत आयोजन केले होते. त्यावेळी खासदार राजीव सातव हजर झाल्याने त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत होते. मैदानात नसतानाही हिंगोलीत सातव यांना मिळालेला प्रतिसाद पाहून 'हारकर बी जितने वालो को बाजीगर कहते है' असाच काहीसा अनुभव आला.

राजीव सातव यांची हिंगोलीला भेट

या बैठकीला माजी आमदार भाऊराव पाटील-गोरेगावकर यांना निमंत्रण न दिल्याचे त्यांनीच सांगितले. अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट दिसून आले. खासदार सातव यांच्यावर गुजरात राज्याची जबाबदारी असल्याने त्यांनी लोकसभेतून माघार घेतली. विशेष म्हणजे सातव हे राहुल गांधींचे अतिशय निकटवर्तीय असल्याने अन् गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे असल्यानेही सातव यांना तिकडेच लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे बोलले जाते.
दुसरीकडे मात्र, सातवांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात संपर्कही कमी झाला होता. त्यामुळेच की, काय सातव यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु, या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून कोणता सक्षम उमेदवार ही दिसून आला नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या आजी-माजींना विश्वासात घेत भाजपमधून सुभाष वानखेडे यांना आयात करत निवड केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुभाष वानखेडे यांनी मोदींच्या विविध योजना सांगत अन शिवसेनेत कार्यकर्त्यांना होणारा त्रास सांगून उपस्थितांना हसविले होते. या मेळाव्यात राजीव सातव नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात होते.
उमेदवारी घोषित झाल्याने राजीव सातव समर्थकात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीस राजीव सातव हजर झाले होते. त्यांच्या वाहनाचा नांदेडपासून एवढा मोठा ताफा होता की, सातव याना त्यांचे समर्थक जराही बोलण्याचा प्रयत्न करीत असताना, मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत होती. आघाडा बाळापूर या ठिकाणी अक्षरशः वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या अंतराला जवळपास दीड ते दोन तास लागले होते.
सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळून देण्यासाठी सर्वाधिक जास्त प्रयत्न करणारे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच निमंत्रण न दिल्याने आता याची देखील उलट सुलट चर्चा रंगत आहे. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जोरदार घडामोडी सुरू असल्या तरी, आशा परिस्थितीत खासदार सातव हिंगोलीत आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सातव जिंकल्यासारखेच चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे एका चित्रपटातील अभिनेत्याचा डायलॉग आठवण करून देत होता.

Intro:हिंगोली लोकसभा मतदार संघात मागील काही दिवसांपासून तापमाना प्रमाणेच राजकीय वातावरण ही तापून निघत आहे. त्यातच काँग्रेस ने भाजपमधून आयात केलेला उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचार बैठकीचे आज हिंगोली येथे एका खाजगी ठिकाणी आयोजन केले होते. त्या ठिकाणी आज खा. राजीव सातव मोठ्या गाड्याच्या ताफ्यासह हजर झाल्याने त्यांची भेट घेऊन त्यांना आलिंगन देण्यापर्यन्त कार्यकर्ते व मतदार एकच गर्दी करीत होते. मैदानात नसतानाही सर्व आटोपल्यावर सातव हिंगोलीत आल्यामुळे, हे सर्व पाहून 'हारकर बी जितने वालो को बाजीगर कहते है' असाच काहीसा अनुभव आल्याचे दिसून आले. मात्र या बैठकीला माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच निमंत्रण न दिल्याचे खुद्द पाटील यांनी सांगितले.त्यामुळे अनेक दिवसांपासून काँग्रेस मध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी आज पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट दिसून आले.

Body:खा. राजीव सातवावर गुजरात राज्याची जबाबदारी असल्याने त्यांनी लोकसभेतून माघार घेतली. विशेष म्हणजे सातव हे राहून गांधींचे अतिशय निकट वर्तीय असल्याने अन गुजरात राज्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे असल्यानेही सातव यांना तिकडेच लक्ष घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे मात्र सातवांचे हिंगोली लोकसभा मतदार संघात संपर्क ही कमी झाला होता. त्यामुळेच की ककाय सातव यांनी माघार घेतल्याचे बोलल्या जात आहे. परंतु या निवडणुकीसाठी काँग्रेस कडून कोणता सक्षम उमेदवार ही दिसून आला नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या आजी- माजीना विश्वासात घेत भाजप मधून सुभाष वानखेडे यांना आयात करत निवड केली. याला यश ही आले. उमेदवारी अर्ज दाखक करण्याच्या दिवशीच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुभाष वानखेडे यांनी मोदीच्या विविध योजना सांगत अन शिवसेनेत कार्यकर्त्यांना होणार त्रास सांगून उपस्थिताना खळवळून हसविले होते. तर याही मेळाव्यात राजीव सातव नसल्याने त्यांची अनुपस्थितीचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात होते. उमेदवारी घोषित झाल्याने राजीव सातव समर्थकात नाराजीचा सूर उमटला होता. मात्र वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीस खा. राजीव सातव आज हजर झाले होते. त्यांच्या वाहनाचा नांदेड पासून एवढा मोठा ताफा होता की सातव याना त्यांचे समर्थक जराही बोलण्याचा प्रयत्न करीत असताना,मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत होती. आघाडा बाळापूर या ठिकाणी अक्षरशः वाहतूक ठप्प झाली होती. एक तासाच्या अंतराला जवळपास दीड ते दोन तास लागले होते.

Conclusion:सातव यांच्या जवळ अनेक मतदार उसरमा करीत होते, तर काही उघड उघड आम्हा ला कोणाच्या हवाली केले, आम्ही कोणाच्या भरवशावर आता राहायचं, अशा एक ना अनेक खंत व्यक्त करीत होते. काही कार्यकर्ते तर रडायला जोर करत होते. कसे बसे सातव बैठकीला पोहोचले. तेथे मात्र नेहमीच्या त्याच स्टाईल मध्ये कार्यकर्त्यांची, मतदारांची सातव यांनी नाराजी काढली. तर मी तुमच्या सोबत असल्याचे ही सांगितले. दुसरीकडे मात्र सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळून देण्यासाठी सर्वाधिक जास्त प्रयत्न करणारे माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनाच निमंत्रण न दिल्याने आता याची देखील उलट सुलट चर्चा रंगत आहे. एवढेच नव्हे तर पाटील यांच्या समर्थकात नाराजी पसरली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जोरदार घडामोडी सुरू असल्या तरी, आशा परिस्थितीत खा. सातव हिंगोलीत आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सातव जिंकल्यासारखेच चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे एका चित्रपटातील अभिनेत्याचा डोयलॉग आठवण करून देत होता.

व्हिज्युअल ftp केले आहेत ते या बातमीत वापरावेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.