ETV Bharat / state

शिवसेना सोबत नाही तर भाजपला इज्जत नाही, आमदार बांगर यांची टीका - hingoli latest news

शिवसेना सोबत होती तेव्हा भाजपला इज्जत होती. आता शिवसेना सोबत नाही तर इज्जतही नाही. याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून मिळवलेला सतीश चव्हाण यांचा विजय, अशी टीका बांगर यांनी केली.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
author img

By

Published : Dec 6, 2020, 5:21 PM IST

Updated : Dec 6, 2020, 5:27 PM IST

हिंगोली- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयाचा हिंगोली येथे शुक्रवारी (दि. 6 डिसें.) जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर म्हणाले, शिवसेना सोबत होती तेव्हा भाजपला इज्जत होती. आता शिवसेना सोबत नाही तर इज्जतही नाही. याचे उदाहरण म्हणजे सतीश चव्हाण यांचा विजय असल्याचे टीका बांगर यांनी केली.

बोलताना आमदार बांगर

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे सर्वाधिक जास्त मताधिक्क्याने निवडून आले आहेत. त्यामुळे यामुळे महाविकास आघाडीकडून हिंगोली येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोषात सहभागी झाले होते. दरम्यान, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आनंदोत्सव साजरा करत असताना अतिशय खालच्या स्तरात भाजपवर सडकून टीका केली आहे.

भाजपला जनतेने त्यांची जागा दाखवली

महाविकास आघाडीचा विजय म्हणजेच जनतेचा विजय आहे. निवडणुकीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात इतरत्र फिरून भाजपला विजयी करायचे आहे, असे म्हणत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना विविध दिग्गज नेत्यांकडून मते मागितली जात होती. मात्र, जनतेने अजिबात त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता हा विजय म्हणजे भाजपला खरोखरच धूळ चाखण्यासारखे आहे. त्यामुळे आता भाजपने येथून पुढे तरी महाविकासआघाडी सोबत बरोबर राहायला हवे, असा सल्ला आमदार बांगर यांनी दिला आहे.

हेही वाचा - नेत्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; घाई केल्याने अर्धवट फटाके विझवण्याची आली वेळ

हेही वाचा - काडतुसांसह पिस्तुल आणि रायफल जप्त ; गुन्हे शाखेची कारवाई

Last Updated : Dec 6, 2020, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.