ETV Bharat / state

लोकांच्या 'चुली' पेटविणाऱ्या वृक्षांची हिंगोली जिल्ह्यात शेती; लाखो रुपयांची होणार 'कमाई'

माधव किसन कऱ्हाळे आणि वैजनाथ दादाराव कऱ्हाळे हे दोन शेतकरी लोकांच्या चुली पेटविणाऱ्या मीलूडूबिया या वृक्षाची शेती करतात. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातच लागवड केलेले असल्याने या वृक्षाची वाढण्यासाठी स्पर्धा लागली आहे. वृक्षदेखील रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

author img

By

Published : May 8, 2019, 12:28 PM IST

मीलूडूबिया वृक्षाची शेती

हिंगोली - शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक शेतीला एवढे वैतागले आहेत, की काही शेतकरी शेती विकायला निघाले आहेत. तर काही त्याच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. मात्र, टंचाईच्या काळात स्वतःला धीर देत जिल्ह्यातील काही शेतकरी लोकांच्या चुली पेटविणाऱ्या मीलूडूबिया या वृक्षाची शेती करतात. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातच लागवड केली असल्याने या वृक्षांची वाढण्यासाठी स्पर्धा लागली आहे. वृक्षदेखील रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मीलूडूबिया वृक्षाची शेती

हिंगोली जिल्ह्यावर दरवर्षीच पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी टंचाईला कंटाळून शेती करणेच सोडून दिले. काही शेतजमीन मक्त्याने देण्याच्या तयारीत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे येथील माधव किसन कऱ्हाळे आणि वैजनाथ दादाराव कऱ्हाळे या दोन शेतकरी मात्र याला अपवाद ठरले आहेत. या दोन शेतकऱ्यांनी दूरदूरष्टीचा विचार करून, एकर भर शेतात मिलूडुबिया या वृक्षाची लागवड केली. वृक्ष लातूर येथील एका नर्सरीमधून आणले. दहा बाय दहा अन् पंधरा बाय पंधरावर 302 झाडांची दोन वर्षापूर्वी 40 हजाराच्या वर खर्च आला आहे. या वृक्षांना महाराष्ट्रातील तापमान आल्हाददायक असल्याने, या वृक्षाची वाढही बऱ्यापैकी होते. जवळपास एक- एक वृक्ष 25 ते 30 फूट उंच वाढते. वृक्षाची तोड ही सहा वर्षानंतर केली जाते. एक वृक्ष एक ते दोन टनांपर्यंत जाऊन पोहोचते. कंपनी थेट शेकऱ्यांसोबत संपर्क साधते.

हिंगोली जिल्ह्यात या वृक्षाची तोड करून कंपनीपर्यंत पोहोचविणारे एजंटही बरेच आहेत. सहा ते सात हजार टनाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जात असल्याची माहिती, कऱ्हाळे यांनी दिली. मात्र अजून आमचे वृक्ष तोडण्यासाठी चार वर्षाचा कालावधी बाकी आहे. तेव्हाच आम्हाला खरा अनुभव येणार आहे. यात अंतर पीक म्हणून हळद हे पीक घेतले जाते.

हे वृक्ष पुर्णतः जंगली असल्याने कोणत्याही ऋतुत या वृक्षाची वाढ होते. 302 वृक्ष विक्रीतून 18 ते 20 लाखांचे उत्पन अपेक्षित आहे. एवढे उत्पन्न खर्च वजा पदरात पडले तर या वृक्षांची शेती करणे फायदेशीर ठरू शकेल. कंपनी जरी या वृक्षापासून बनणाऱ्या वस्तूंची आकडेवारी सांगत असली, तरीही शेतकऱ्यांना खरोखरच कंपनीकडून फायदा होईल का ? हादेखील मोठा प्रश्नच आहे. जिल्ह्यात 40 ते 50 शेतकरी गटांनीही या वृक्षाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर लागवड केली, तर काहीनी चक्क शेतातच लागवड केली आहे. त्यापैकीच डिग्रस येथील हे दोघे जण चांगलेच या मिलूडुबिया वृक्षाच्या प्रेमात पडले आहेत. मात्र पाणी टंचाईमुळे झाडे जगविण्याचे मोठे संकट या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. ही झाडे लावण्यासाठी कोणत्याही विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Intro:
शेतकरी दिवसेंदिवस पारंपरिक शेतीला एवढे वैतागले आहेत की, काही शेतकरी शेती विकायला निघालेत तर काही त्याच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. मात्र टंचाई च्या काळात स्वतःला धीर देत जिल्ह्यातील काही शेतकरी लोकांच्या चुली पेटविणाऱ्या मीलूडूबिया या वृक्षाची शेती करतात. हे वृक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातच लावगड केलेले असल्याने या वृक्षाची वाढण्यासाठी स्पर्धा लागलीय. वृक्ष देखील रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Body:हिंगोली जिल्ह्यावर दर वर्षीच पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी टंचाईला कंटाळून शेती करणेच सोडून दिलेय. काही शेत जमीन मक्तत्याने देण्याच्या तयारीत आहेत. मात्र हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस कऱ्हाळे येथील माधव किसन कऱ्हाळे अन वैजनाथ दादाराव कऱ्हाळे या दोन शेतकरी मात्र अपवाद ठरले आहेत. या दोन शेतकऱ्यांनी दूरदूरष्टीचा विचार करून, एकर भर शेतात मिलूडुबिया या वृक्षाची लावगड केली. वृक्ष लातूर येथील एका नर्सरी मधून आणले. दहा बाय दहा अन पंधरा बाय पंधरा वर ३०२ झाडांची दोन वर्षापूर्वी ४० हजाराच्या वर खर्च आला आहे. या वृक्षाना महाराष्ट्रांतील तापमान आल्हाददायक असल्याने, या वृक्षाची वाढ ही बऱ्या पैकी होते. जवळ पास एका- एका वृक्ष २५ ते ३० फूट उंच वाढते. वृक्षाची तोड ही सहा वर्षानंतर केली जाते. एक वृक्ष एक ते दोन टनांपर्यंत जाऊन पोहोचते. कंपनी थेट शेकऱ्या सोबत संपर्क साधते, तर हिंगोली जिल्ह्यात या वृक्षाची तोड करून कंपनी पर्यन्त पोहोचविणारे एजंट ही बरेच आहेत. सहा ते सात हजार टना प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जात असल्याची माहिती. कऱ्हाळे यांनी दिली. मात्र अजून आमचे वृक्ष तोडण्यासाठी चार वर्षाचा कालावधी बाकी आहे. तेव्हाच आम्हाला खरा अनुभव येणार आहे. यात अंतर पीक म्हणून हळद हे पीक घेतले जाते.

Conclusion:हे वृक्ष पुर्णतः जंगली असल्याने कोणत्याही ऋतुत या वृक्षाची वाढ होते. आज घडीला ३०२ वृक्ष विक्रीतून १८ ते २० लाखांचे उत्पन अपेक्षित आहे. एवढे उत्पन्न खर्च वजा पदरात पडले तर ही या वृक्षांची शेती करणे फायदेशीर ठरू शकेल.कंपनी जरी या वृक्षा पासून बनणाऱ्या वस्तूंची आकडे वारी सांगत असली तरीही शेतकऱ्यांना खरोखरच कंपनीकडून फायदा होईल का ? हा देखील मोठा प्रश्नच आहे. जिल्ह्यात ४० ते ५०शेतकरी गटांनी ही या वृक्षाची लावगड केली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या धुऱ्यावर लावगड केली तर काहीनी चक्क शेतातच लावगड केली आहे. त्या पैकीच डिग्रस येथील हे दोघे जण. चांगलेच या मिलूडुबिया या वृक्षाच्या प्रेमात पडले आहेत. मात्र पाणी टंचाई मुळे झाडे जगविण्याचे मोठे संकट या शेतकऱ्यासमोर उभे ठाकले आहे. तसेच हे झाडे लावण्यासाठी कोणत्याही विभागाकडून अनुदान मिळाले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.