हिंगोली - येथे जिल्हा पोलीस दलातर्फे एकात्मता संदेश देण्यासाठी काढलेल्या मॅरेथॉन रॅलीत हिंगोलीकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. या रॅलीला संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरून सुरुवात झाली. यावेळी या रॅलीत हिंगोलीकरांनी उस्फुर्त सहबाग नोंदवला.
या मॅरेथॉनमध्ये अठरा वर्षांवरील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. या रॅलीला संत नामदेव कवायत मैदान येथून सुरुवात झाली. इंदिरा गांधी चौक, अग्रसेन चौक, बिरसा मुंडा चौकातून जुन्या जिल्हा परिषदेकडून पुन्हा अग्रेसन चोक येथील इंदिरा गांधी चौकातून संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे ही मॅरेथॉन संपन्न झाली. रॅलीदरम्यान चौकाचौकांमध्ये रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती.
हेही वाचा - हिंगोलीत पोलिसांवर आली रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची वेळ
मॅरेथॉन दरम्यान टीम स्वरगंधातर्फे म्युझिक इव्हेंटच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मॅरेथॉनमध्ये महिलांमध्ये प्रथम अंकिता दिलीप गव्हाणे, द्वितीय चंदा बालाजी मुंढे, तृतीय पूजा विलास भिसे तर पुरुषांमध्ये ओम कव्हेरकर, द्वितीय ओम पोले आणि तृतीय अमीरा चव्हाण यांनी यांनी बाजी मारली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनादेखील प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.