ETV Bharat / state

काही दिवसातच कोसळणार आघाडी सरकार; दरेकरांची हिंगोलीत भविष्यवाणी - महाविकास आघाडी सरकार कोसळणार

महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने सत्तेत आले आहे. मात्र, एक वर्षात त्यांनी जनतेची कोणतीही कामे केली नाहीत. तसचे बिहार निवडणुकीवरून सर्व काही परिस्थिती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच हे सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी दरेकर यांनी केली

pravin darekar
प्रवीण दरेकर
author img

By

Published : Nov 23, 2020, 6:56 PM IST

Updated : Nov 23, 2020, 7:24 PM IST

हिंगोली - राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. तेव्हापासून भाजपाकडून वारंवार सरकार पाडण्यासंदर्भातील वक्तव्ये केली जात आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित केले आहे. जोपर्यंत जनतेचा मूड आहे तोपर्यंत सर्व काही ठीक आहे. या सरकारकडून वर्षभरातच जनतेची फार निराशा झालेली आहे, एवढेच नव्हे तर हे सरकार अनैसर्गिक स्थापन झालेले आहे. या सरकारला जनतेचे कोणतेही प्रश्न सोडविण्यात यश आलेले नाही. बिहारच्या निवडणुकीवरून सर्वकाही परिस्थिती लक्षात आलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे सरकार पडणार असल्याची भविष्यवाणी दरेकर यांनी केली आहे.

औरंगाबाद विभाग मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे असलेले उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे हिंगोली येथे आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

अनैसर्गिक सरकारचे मुख्यमंत्री बोलत नाहीत-

दरेकर पुढे म्हणाले, की या सरकारला जनतेचे काहीही देणे घेणे नाही. एवढेच काय तर हे सरकार जातीचे राजकारण करते, त्यामुळे जनता निश्चितच या सरकारला या पदवीधर निवडणुकीमध्ये जागा दाखवणार आहे. कारण निवडणुका झाल्यानंतर हे अनैसर्गिक सरकार स्थापन झाल्यानंतर पदवीधर मतदारसंघाची ही पहिलीच निवडणूक आहे. जोपर्यंत जनतेचा मूड होता, तोपर्यंत या आघाडी सरकारला जनतेने भरभरून साथ दिली. मात्र एका वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने जनतेची कोणतीही कामे पूर्णत्वास नेलेली नाहीत. एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील कोणत्याही विषयावर स्पष्ट बोलत नाहीत. त्यामुळे जनताही नाराज आहे.

आमच्या काळात असे अजिबात झालेले नाही जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे कोणतेही कामे किंवा प्रश्न प्रलंबित राहू दिले नाहीत त्यामुळे आघाडी सरकारकडून केवळ एकाच वर्षांमध्ये जनतेची निराशा झालेली आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे सरकार पडणार यामध्ये काही दुमत नाही. अशी भविष्यवाणी दरेकर यांनी वर्तविली आहे.

आघाडी सरकारमध्ये जाती-पातीच राजकारण; मात्र पदवीधर दाखवून देतील-

आघाडी सरकार हे जाती-पातीच्या नावावर राजकारण करते. मात्र भाजप सरकार हे जाती पातीच्या नावावर कधीच राजकारण करीत नाही. या पदवीधर निवडणुकीमध्ये या सरकारला जागा दाखवून देणार असल्याचे, विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी सांगितले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Nov 23, 2020, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.