ETV Bharat / state

Whatsapp Blackmailing : व्हाट्सऍपवरून बहरले प्रेम, हिंगोलीच्या तरुणीला केले ब्लॅकमेल, तेलंगणातून तरुण अटकेत

author img

By

Published : Feb 2, 2022, 7:35 PM IST

ती हिंगोलीची. तो तेलंगणातील मेहबूबनगरचा. व्हाट्सऍपवरून दोघांची ओळख झाली. बघता बघता दोघांत प्रेम बहरले. तरुणाने तरुणीचे फोटो मागवून घेतले अन् इथेच विश्वासाला तडा गेला. तरुणाने फोटो व्हायरल करायची धमकी देत पैशांची मागणी केली ( Whatsapp Blackmailing ). तरुणीने हुशारी दाखवत पोलिसात तक्रार दिली अन् पोलिसांनी तरुणाला थेट तेलंगणातून अटक ( Young Man Arrested From Telangana ) केली.

व्हाट्सअप
व्हाट्सअप

हिंगोली- आता व्हाट्सऍप वापरणाऱ्यांची संख्या ही प्रचंड वाढत चालली आहे. मात्र, त्याच व्हाट्सऍपवरून एका तरुणाने मैत्री करत तरुणीचे तिचे फोटो मागवून घेतले. अन् नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली ( Whatsapp Blackmailing ). या प्रकरणी तरुणीने पोलिस ठाणे गाठून त्या तरुणावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यास तेलंगणा येथून ताब्यात घेतले ( Young Man Arrested From Telangana ) आहे. त्यामुळे रात्र- रात्र जागून व्हाट्सऍपवरून बहरलेल्या प्रेमाचा हिंगोलीत असा शेवट झाला ( Whatsapp Love End In Hingoli ) आहे.

व्हिडिओ कॉलिंग वरून संवाद

मोहम्मद अफरोज खान जीलानी खान असं या तरुणाचं नाव आहे. मोहम्मद हा तेलंगणा राज्यातील महेबूबनगर येथील रहिवासी आहे. त्याने व्हाट्सऍपच्या माध्यमातून वसमत येथील तरूणीशी मैत्री केली. रोज व्हाट्सऍपवर चॅटिंग करत करत मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्याना समजलेच नाही. हे दोघे प्रेमामध्ये इतके गुरफटून गेले की, एकमेकांना बोलल्याशिवाय यांच्या दिवसाची सुरवातच होत नव्हती. हीच संधी साधत लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न तरुण करत होता. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याही पुढे जात व्हिडिओ कॉलिंग वरून संवाद साधण्यास सुरुवात केली.

तरुणाने केली स्क्रीन रेकॉर्डींग

या दोघांचा संवाद वाढल्यानंतर तरुणी पूर्णपणे विश्वासात आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग केली. तसेच लग्नाचे आमिष देत तरुणीकडून तिचे फोटो देखील मागून घेतले. असाच संवाद सुरू ठेवला.

धमकी देत करत होता पैशाची मागणी

लग्नाचे आमिष दाखवल्याने तरुणी पूर्णपणे तरुणावर प्रेम करत होती. मात्र, या प्रेमाचा फायदा तरुणाने घेत तरूणीचे फोटो, व्हिडिओ नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. त्या संपूर्ण प्रकाराने तरुणी चांगलीच गोंधळून गेली. हा प्रकार तिने आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यावरून नातेवाईकांनी थेट पोलिस ठाणे गाठून या प्रकरणात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी चौकशी करून यामध्ये मोहम्मद अफरोज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हिंगोली
हिंगोली

तेलंगणामधून पथकाने घेतले तरुणाला ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर वसमत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक प्रतिभा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भागीरथी सवंडकर- मिटकर, गोरलावाड यांच्या पथकाने आरोपी मोहम्मद आफरोज यास तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.