ETV Bharat / state

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर, विक्रेत्यांना फटका

author img

By

Published : Sep 6, 2019, 8:23 PM IST

हिंगोलीतील जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधील कमळाची फुले उगवणे कमी झाले आहे. त्यामुळे एकेकाळी कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीमधून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर

हिंगोली - मागील काही वर्षांपासून हिंगोलीतील जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधील कमळाची फुले उगवणे कमी झाले आहे. त्यामुळे एकेकाळी कमळाच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीमधून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हिंगोलीतून कमळाची फुले नामशेष होण्याच्या मार्गावर

गौरीपुजनाच्या दिवशी कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी असत. यावर्षी मात्र जलेश्वर आणि सिरेहकशाह बाबा दर्गा या तलावांमधे पुरेशी फुले उगवली नाहीत. त्यामुळे विक्रेते बाहेरून फुलांची खरेदी करून विक्री करत आहेत. शहरातील दोन्ही तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच तलावाची पाणीपातळी खालावत असल्याने, कमळाची फुले उगवण्याचे प्रमाण कमी झाले. दोन वर्षांपूर्वी ही परिस्थिती उलट होती. फुलांची संख्या प्रचंड होती. दोन्ही तलावातील फुले तोडणी करण्यासाठी महसूल विभागाकडून पूर्व परवानगी आणि निवीदादेखील भरली जायची.

हेही वाचा - अमरावतीतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारला पर्यावरणपूरक गणपती

या फुल विक्रीवरच पोटाची खळगी भरणाऱ्या बऱ्याच फुल विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बदलला आहे. हिंगोलीच्या महसूल विभागाने शहराचे वैभव असलेल्या या दोन्ही तलवांचे शुद्धीकरण केले तर निश्चितच पुढच्या वर्षी कमळाच्या फुलांच्या संख्येत वाढ होईल, असे फुल विक्रते माधव करवंदे यांनी सांगितले.

Intro:

हिंगोली- एकेकाळी हिंगोलीचे वैभव असणाऱ्या जलेश्वर आणि सिरी हक बाबा दर्गा परिसरात असलेल्या तलावात मोठ्याप्रमाणात कमळाची फुले उगवत असतो मात्र गेल्या दोन वर्षापासून या दोन्ही तलावांमध्ये कमळाची फुले उगवणे कमी झाल्याने फुल विक्रेत्यांची मोठी गोची निर्माण झाली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कमळाच्या फुलाला सोन्यासारखा भाव असतो मात्र फुले ची असल्याने बाहेरगावावरून फुले खरेदी करून विक्री करावे लागत असल्याचे विदारक चित्र एका विक्रेत्याने सांगितले.

Body:
हिंगोली शहराजवळ असलेल्या सिरेहकशाह दर्गा परिसरातील तलावात आणि शहराच्या अगदी मधोमध असलेल्या जलेश्वर तलावात कमळाची फुले मोठ्या प्रमाणात उगवत असत. मात्र दिवसेंदिवस दोन्ही ही तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने, अन हळूहळू तलावाची पाणीपातळी खालावत असल्याने, कमळाची फुले उगवण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र दोन वर्षापूर्वीची परिस्थिती उलट होती. फुलांची संख्याच एवढी मोठी होती, ती फुले तोडण्यासाठी कंत्राट दिले जायचे. दोन्ही तलावातील फुले तोडणी करण्यासाठी महसूल विभागाकडून पूर्व परवानगी अन याचे टेंडर देखील भरले जायचे. मात्र दोन वर्षांपासून दोन्ही ही तलावातील कमळाच्या फुलांची संख्या रोडात गेली अन या फुल विक्रीवरच पोटाची खळगी भरणाऱ्या बऱ्याच फुल विकर्तेत्यांनी आपला व्यवसाय बदलालाय तर काही विक्रते अजूनही याच फुल विक्री मध्ये गुंतलेले आहेत. या फुल विक्रेत्यांची लक्ष्मी पूजनाचा दिवस म्हणजे सोन्यासारखा दिवस असतो, नेहमी पाच ते दहा रुपयाला विक्री होणारी फुले चक्क 50 ते 60 रुपये जोडी विक्री होतात. सोबतच केळीची पाने, केळीचा कोंब, झेंडूची फुले आदी पूजेचे साहित्य विक्री केले जाते. फुल विक्रेता केवळ फुलेच नव्हे तर कमळांच्या फुलासह इतर ही पूजेचे साहित्य विक्री करतात.,त्यामुळे दिवसाकाठी हजार ते बारसे रुपये केवळ एका दिवसासाठी मिळतात. त्यामुळेच आम्हाला या लक्ष्मी पूजनाच्या दिवसाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असते. हा दिवस म्हणजे खरोखरच आम्हाला लक्ष्मी देऊन जाणारा दिवस असतो. अन पूजेचे साहित्य विक्रीतुन आमच्या घरात लक्ष्मी येत असल्याचे फुल विक्रते माधव करवंदे यांनी सांगितले. त्याच बरोबर आम्ही देखील स्वतःला नशीबवान समजतो की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरोघर आमचे लक्ष्मी साठी लागणारे साहित्य जाते. Conclusion:याचे खूप समाधान लाभते.या समाधानातून बाहेर गावावरून कमळाची फुले विक्रीसाठी आणल्याचा थकवा देखील विसरून जात असल्याचे करवंदे यांनी सांगितले. हिंगोलीच्या महसूल विभागाने शहराचे वैभव असलेल्या दोन्ही तलवाचे शुद्धीकरण केले तर निश्चितच पुढील वर्षीच्या लक्ष्मीपूजनासाठी हिंगोलीतच फुले मिळण्यास मदत होईल. महसूल विभागाने पुढाकार घेण्याची मागणी करवंदे यांनी केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.