ETV Bharat / state

हिंगोली लोकसभा : महायुतीचे हेमंत पाटील विजयी, तर काँग्रेसचे सुभाष वानखेडेंचा पराभव - सुभाष वानखेडे

शिवसेनेचे हेमंच पाटील सायंकाळी ६ पर्यंत आघाडी वर होते. मात्र, आता त्यांचा विजय झाला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांना पराभूत केले.

हेमंत पाटील, मोहन राठोड आणि सुभाष वानखेडे
author img

By

Published : May 23, 2019, 6:26 AM IST

Updated : May 23, 2019, 7:40 PM IST

LIVE UPDATES -

  • सा 7.20 - शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले आहे.
  • दु. ४.३२ - हेमंत पाटील १ लाख ३७ हजार २८ मतांनी आघाडी
  • दु. ४.०० वा. - माझा विजय निश्चित, हेमंत पाटलांचा विश्वास
  • दु. ३.३० वा. - हेमंत पाटील १ लाख २१ हजार ३३५ मतांनी आघाडीवर
  • दु. ३.११ वा. - सहाव्या फेरीत हेमंत पाटील यांना २१ हजार ६१० मते, सुभाष वानखेडे १४ हजार ७८१ आणि मोहन राठोड यांना ५ हजार ४८२ मते पडलेली आहेत.
  • दु. ३.१७ वा. - हेमंत पाटील आघाडीवर असले तरी निवडून मीच येणार, काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांचा दावा
  • दु. १.२२ वा. - हेमंत पाटील ५७ हजार मतांनी आघाडीवर
  • दु. १२.४२ वा. - मतमोजणीला विलंब होतोय.
  • स. १०.०८ वा. - हेमंत पाटील यांना २२ हजार ५०, सुभाष वानखेडे यांना १००२४, तर वंचित आघाडीच्या राठोड यांना ७८७८ मते पडलेली आहेत.
  • स. ९.३७ वा. - महायुतीचे हेमंत पाटील आघाडीवर
  • स. ९.०२ वा. - वंचितांचा आम्हाला पाठिंबा. त्यामुळे आम्ही विजयी होणार, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांनी व्यक्त केला, तर जनतेचा शिवसेनेला पाठिंबा असल्याने एनडीएचा विजय निश्चित असल्याचे युतीचे उमेदवार हेमंत पाटील म्हणाले.
  • स. ८.०० वा. - मतमोजणीला सुरुवात
  • स. ७.२७ वा. - हेमंत पाटील यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन. निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच आमचा निकाल आम्हाला माहीत असल्याचे म्हणाले.

हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे आज स्पष्ट होणार आहे. यासाठी शहरातील एमआयडीसी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघातून शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुभाष वानखेडे रिंगणात होते, तर महायुतीकडून शिवसेनेचे नांदेड दक्षीणचे आमदार हेमंत पाटील मैदानात उतरले होते. मात्र, आता हिंगोलीची जनता त्यांच्या विकासासाठी कुणाला दिल्लीत पाठवणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतल्यामुळे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुभाष वानखेडे यांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. तर महायुतीकडून नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेकडून ३ वेळेस आमदारकी अन् एकदा खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे आता वानखेडे विजयी होणार? की नांदेडचे पाटील हिंगोली मतदारसंघाचा कारभार पाहणार हे आज स्पष्ट होईल.

या मतदारसंघात १८ एप्रिलला झालेल्या मतदानवेळी एकूण ११ लाख ५२ हजार ५४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण ६६.५२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

२०१४ ची राजकीय परिस्थिती -
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजीव सातव हे १ हजार ६३२ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी सध्या काँग्रेसवासी झालेल्या शिवसेनेच्या सुभाष वानखेडेचा पराभव केला होता. आतापर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघाने कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने कौल दिलेला नाही. जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. यंदा हिंगोलीकर कोणत्या पक्षाला खासदार बनण्याची संधी देणार? ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.