हिंगोली - शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या लाला लजपतराय नगरमध्ये जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस जुगाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने कारवाईचा धडाका सुरू आहे. या ठिकाणी गणेशोत्सव काळातही कारवाई केली होती. मात्र, तरीदेखील जुगाऱ्यांवर काहीही परिणाम होत नसल्याचे चित्र या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा - हैदराबाद बलात्कार,खून प्रकरण; पीडितेचे नाव बदलून केले 'जस्टिस फॉर दिशा'
आरोपींकडून नगद 41 हजार 580 रुपये, 8 मोबाईल असा 1 लाख 3 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर आर्थिक व्यवहारातून हा जुगार सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. जुगार पायी अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत, त्यामुळे यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा - निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपीचा दया अर्ज फेटाळण्याची शिफारस
आरोपींची नावे अशी -
हरीश गणेशलाल साहू (गोलंदाज गल्ली) अमोल जयाजी काकडे (यशवंत नगर), रतन पोचीराम डोम्पे (गणेशवाडी), राजू अमृता घुगे(येडूत), संजय वामनराव शिंदे(जलालधाबा),शेख खदीर शेख हनिफ, (धामणी) दिगांबर नागोराव फंदे (अंतुले नगर हिंगोली), रनवीर शेरसिंग टाक (ठोरपूरा रिसाला), जनार्धन काशिनाथ घुगे (येडूत), नितीन लक्ष्मीकांत हजारे (वसमत) या आरोपींना अटक करण्यात आली आहेत. तर ओमप्रकाश डिंगाबर वाघमारे (रा. लाला लजपतराय नगर) आरोपींची नावे आहेत. यामध्ये काही प्रतिष्ठित नागरिकांचा ही समावेश असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.