हिंगोली - जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने कयाधु नदी दुसऱ्यांदा ओसंडून वाहत आहे. यासोबतच नदी, नाले ही दुथडी भरून वाहत असल्याने विहीर व बोअरची पाणी पातळी वाढली आहे. नदीचे हे अक्राळ-विक्राळ रूप पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
हेही वाचा - गोष्ट वायरलेस प्रेमाची, अंकुश चौधरीच्या 'ट्रीपल सीट'चा टीजर प्रदर्शित
जिल्ह्यातून वाहणारी कयाधु नदी प्रत्येक पावसाळ्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण करते. या नदीचे उग्र रूप पाहण्यासाठी नागरिक आवर्जून हजेरी लावतात. यावर्षी अद्यापपर्यंत सरासरीच्या 62.82 टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे बऱ्याच भागातील नदी नाल्याकाठची शेतजमीनीची माती वाहून गेली. याचबरोबर वीज पडून हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील नामदेव कऱ्हाळे या शेतकऱ्याचे तीन ते चार गुंठ्याचे नुकसान झाले. पावसाने रात्रभर हजेरी लावल्यामुळे रस्त्यावरील गाळ मोठ्याप्रमाणात वाहून गेला.
हेही वाचा - पतौडी पॅलेसमध्ये करिना कपूरच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन
मागील पाच वर्षांपासून याच नदीवर उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे नदीचे पाणी थांबवू शकले नाही. तर याच नदीवर अजून पाच बंधाऱ्याना मंजूरी मिळाली आहे. त्याचे काम याच वर्षी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.