ETV Bharat / state

VIDEO : कळमनुरी मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराची मतदार विद्यार्थ्याने केली फजिती - kalamnuri assembly election 2019

समाजमाध्यमांमुळे यंदाची निवडणूक ही आणखीनच रंगतदार झाली आहे. कोण, केव्हा आणि कधी कॅमेरा काढून फेसबुक लाईव्ह करेल किंवा व्हिडिओ सुरू करेल याचा काही अंदाज नाही. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तर कहरच झाला. काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे यांच्याशी एका मतदाराने थेट प्रश्न विचारून फजिती केली आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराची मतदाराने केली फजिती
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:54 AM IST

हिंगोली - समाजमाध्यमांमुळे यंदाची निवडणूक ही आणखीनच रंगतदार झाली आहे. कोण, केव्हा आणि कधी कॅमेरा काढून फेसबुक लाईव्ह करेल किंवा व्हिडिओ सुरू करेल याचा काही अंदाज नाही. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तर कहरच झाला. काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे हे गावात प्रचाराला आले असता, त्यांना एका विद्यार्थ्याने मोबाईल कॅमेरा चालू करुन 'बीएड प्रवेशासंबंधीचा प्रश्न आपल्याकडे घेऊन आलो असता, तुम्ही दुर्लक्षीत केले. तर आम्ही तुम्हाला यावेळी मत का द्याव?' असा प्रश्न उपस्थित केल्याने टारफे यांची खूप फजिती उडाली.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराची मतदाराने केली फजिती

हेही वाचा - सत्ता आणि बहुमताची भाजपला मुजोरी, राज ठाकरे यांचा हल्लाबोल

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. प्रचारासाठी कमी दिवस असल्याने, उमेदवार जिवाचे रान करत आहेत. विवीध पक्षाचे उमेदवार आपल्या मतदारसंघातील गावात कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहेत. मात्र, अशाच परिस्थितीत मतदार ही उमेदवारांना मागील कालावधीची आठवण करून देण्याची जराही कसर सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सध्या सोयाबीन काढणीचा कालावधी जोरात असल्याने, मतदारही उमेदवारांना भेटने शक्य नाही. त्यामुळे त्या त्या विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते काम करत आहेत.

काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान उमेदवारांच्या भेटी घेण्यासाठी गेले असता, एका मतदाराने व्हिडिओ सुरू ठेवत उमेदवार टारफे समोर प्रश्नांची सरबत्ती केली. एवढेच नव्हे तर तुम्हाला अनेक प्रश्न करून ही तुम्ही काही प्रतिसाद दिला नसल्याचे आम्ही तुम्हाला का मत द्याव? असा प्रश्न उपस्थित केला. टारफे यांनी यावेळी मतदाराची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो मतदार काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

हेही वाचा - कोल्हापुरात राजू शेट्टींना मोठा धक्का; स्वाभिमानीच्या काटेंसह तिघांचा भाजपप्रवेश

Intro:

हिंगोली- यंदाची निवडणूक ही मागील निवडणुकीपेक्षा सोशल मीडियामुळे आणखीन रंगतदार झाली आहे. कोण केव्हा, कुठे कॅमेरा काढून फेसबुक लाईव्ह करेल किंवा व्हिडिओ सुरू करेल याचा काही अंदाजच नाही. याला तोंड द्यावे लागत आहे. काही- काही ठिकाणी तर सुशिक्षित मतदार चक्क भेटीसाठी आलेल्या उमेदवाराचे व्हिडिओ करत त्यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती करून आपले दुखणे मांडत असतांनाचा व्हिडीओ कळमनुरी विधानसभा मतदार संघात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस चे उमेदवार संतोष टारफे यांच्या समोर प्रश्नाचा भडिमार करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Body:
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. प्रचारासाठी कमी दिवस असल्याने, उमेदवार जीवाचे रान करीत आहेत. त्या त्या पक्षाचे उमेदवार आपल्या मतदार संघातील गावात कार्यकर्त्यांना सक्रिय करत आहेत. मात्र अशाच परिस्थितीत मतदार ही उमेदवाराना मागील कालावधीची आठवण करून देण्याची जराही कसर सोडत नसल्याचे चित्र आहे. तसेच सध्या सोयाबीनचे सिझन जोरात असल्याने, मतदार ही उमेदवारांना भेटने शक्य नाही. त्यामुळे त्या त्या विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते प्राण पणाला लावत मतदारांना गावात थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसचे उमेदवार संतोष टारफे हे कळमनुरी विधानसभा मतदार संघात प्रचारादरम्यान उमेदवारांच्या भेटी घेण्यासाठी गेले असता एका मतदाराने व्हिडीओ सुरू ठेवत उमेदवार टारफे समोर प्रश्नांची शरबती केली. एवढेच नव्हे तर तुम्हाला अनेक प्रश्न करून ही तुम्ही काही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगत सर्वांसमोर भडीमार केला. Conclusion:टारफे त्या मतदाराची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो मतदार काही ही ऐकण्यास तयार नव्हता. अन हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आता सभा सुरू झाली की त्या त्या गावातील कार्यकर्ते मतदार हे फेसबुक लाहीव, व्हिडीओ करत आहेत. या प्रकाराने उमेदवारामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.