ETV Bharat / state

जननी सुरक्षा योजनेतील रुग्णवाहिका कधी तोडतील दम याचा नाही नेम. . . . - रुग्णवाहिका

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत प्रारंभीच प्रसूती माता व गरोदर मातांना चांगला लाभही झाला. थेट घरापर्यंत गाडी पोहोचल्यामुळे प्रस्तुती माता व गरोदर मातांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. आता मात्र या योजनेला घरघर लागली आहे.

उभ्या असलेल्या रुग्णवाहिका
author img

By

Published : Jun 3, 2019, 11:46 PM IST

हिंगोली - केंद्र शासनाची अतिमहत्त्वाची योजना म्हणून जननी सुरक्षा योजनेकडे बघितले जाते. या योजनेअंतर्गत प्रारंभीच प्रसूती माता व गरोदर मातांना चांगला लाभही झाला. थेट घरापर्यंत गाडी पोहोचल्यामुळे प्रस्तुती माता व गरोदर मातांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र कालांतराने या योजनेतील रुग्णवाहिकांची दुरुस्ती न केल्यामुळे आज ह्या रुग्णवाहिका पूर्ण भंगार बनलेल्या आहेत. केव्हा कोठे दम तोडतील याचा काही नेमच नसल्याने चालकही या गाड्या चालवण्यासाठी धजावत नाहीत.

माहिती देताना चालक

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील पाच ते सहा महिन्यापासून या योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेत जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळालेल्या तीन रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था झालेली आहे. ज्या रुग्णवाहिकेने चिमुकल्यांसह बाळंत माता नेल्या जातात, त्या रुग्णवाहिकांचे टायर खराब झाले आहेत. काही रुग्णवाहिकांची चार ते पाच महिन्यापासून सर्व्हिसिंग केली नसल्याने त्या भंगार रुग्णवाहिका केव्हा, कुठे, दम तोडतील याचा काही नेमच नाही. अनेकदा गरोदर मातेला घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या टोचन करूनही आणल्याचे दाखले येथील चालक सांगत आहेत. वरिष्ठांकडे कित्येकदा त्यांनी रुग्णवाहिका दुरुस्तीची मागणी केली, मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. एवढेच नव्हे, आता तर दुर्दैवाची बाब म्हणजे डिझेल अभावी जननी शिशु योजनेच्या रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत.

रुग्णवाहिकांना साधे लाईट देखील नाहीत. तरीही अशाच अवस्थेमध्ये चालकांना कर्तव्य बजाविण्याचे फर्माण सोडले जाते. मात्र नाईलाजास्तव चालक कर्तव्य बजातात. अन्येकदा 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या चालकांना रस्त्यावर उपाशी पोटी रात्र काढण्याची वेळ आल्याचे चालक सांगत आहेत. त्यामुळे भीतीपोटी चालक सायंकाळी वेळी मतांना घेऊन जाण्याचे टाळत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी डॉक्टर राऊंड घेतले नसल्याने, प्रसूती मातांना सुट्टी देण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे भर उन्हातच चिमुकल्या बाळासह मातांना घरी नेऊन सोडण्याची वेळ येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

अतिरिक्त शल्यचिकित्सक मंगेश टेहरे म्हणतात, की काही दिवस डिझेलची अडचण होती. मात्र आता बिल दिले आहे, त्यामुळे आता प्रश्न सुटेल असेही त्यांनी सांगितले.

अशी आहे रुग्णवाहिका निहाय स्थिती

एमएच 38, 287 - टायर बदलले नाहीत, ऑईल बदली नाही
एमएच 38, 286 - लाईट नाहीत, टायर बदलले नाहीत
279- चार ते पाच महिने होऊनही अद्याप सर्व्हिसिंग नाही. वास्तविक पाहता 7 ते 8 हजार किमी चालल्यानंतर ऑईल बदली होणे गरजेचे असते. मात्र 40 हजार किलोमीटर होऊनही सर्व्हिसिंग केली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.

Intro:केंद्र शासनाची अति महत्त्वाची योजना म्हणून जननी शिशु योजना कडे बघितले जाते. या योजनेअंतर्गत प्रारंभीच प्रसूती माता व गरोदर मातांना चांगला लाभही झाला. थेट घरापर्यंत गाडी पोहोचल्यामुळे प्रस्तुती माता व गरोदर मातांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र कालांतराने या योजनेतील रुग्णवाहिकांची दुरुस्ती न केल्यामुळे आज ह्या रुग्णवाहिका पूर्णता भंगार बनलेल्या आहेत. केव्हा कोठे मौसम तोडतील याचा काही नेमच नसल्याने चालकही या गाड्या चालवण्यासाठी धजावेनात. असे असतानादेखील डिझेल अभावी या रुग्णवाहिका गेल्या काही दिवसापासून बंद पडलेल्या चे भयंकर चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहावयास मिळाले.

Body:हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय याचा मागील पाच ते सहा महिन्यापासून अक्षरशा पूर्णता बोजवारा उडालाय या ठिकाणच्या अडचणीत सांगताना खरोखरच अंगावर शहारे उभारत आहेत त्यातच अति महत्त्वाची मानली जाणारी जननी शिशु योजना ही ही देखील काही दिवसापासून त्रासदायक बनली आहे या योजनेत जिल्हा सामान्य रुग्णालय मिळालेल्या तीन रुग्णवाहिकांची एवढी बदतर अवस्था झालेली आहे ती ऐकून नक्कीच आपल्याला रुग्णालयावर दया आल्याशिवाय राहणार नाही ज्या रुग्णवाहिकेने चिमुकले बाळंत माता नेल्या जातात त्या रुग्णवाहिका यांच्या टायरची अशी कशी झाली तर काही रुग्णवाहिकांची चार ते पाच महिन्यापासून सर्विसिंग केली नसल्याने त्यावर भंगार रुग्णवाहिका केव्हा कुठे दम तोडतील याचा काही नेमच नाही. अनेकदा भारत माता ला घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या टोचन करूनही आणल्याचे दाखले येथे रात्रंदिवस राहणारे चालक सांगत आहेत. वरिष्ठांकडे कित्येकदा त्यांनी रुग्णवाहिका दुरुस्तीची मागणी केली मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. एवढेच नव्हे तर आता दुर्दैवाची बाब म्हणजे डिझेल अभावी जननी शिशु योजनेच्या रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत. या रुग्णवाहिकांची एवढी दुरवस्था झालेली आहे की, एकच्या वर बाळंत माता न्यायची असेल तर त्या मातेला रुग्णवाहिकामध्ये खाली बसून प्रवास करण्याशिवाय पर्यायच नाही.

Conclusion:रुग्णवाहिकांना साधे लाईट देखील नाहीत, तरीही अशाच अवस्थेमध्ये चालताना ड्युटी बजाविण्याचे फर्मान सोडले जातात. मात्र नाईलाजास्तव चालक ड्युटी बजावत असतात. अन्यकदा 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या चालकांना रस्त्यावर उपाशी पोटी रात्र काढण्याची वेळ ही आल्याची चालक सांगत आहेत. त्यामुळे भीती पोटी चालक सायंकाळच्या वेळी मतांना घेऊन जाण्याचे टाळत आहेत.
तर नेहमीप्रमाणे ढेपाळलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी वेळीच डॉक्टर राऊंड घेतले नसल्याने, प्रसूती मातांना सुट्टी देण्यासही विलंब होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे भर उन्हातच चिमुकल्या बाळासह मातांना घरी नेऊन सोडण्याची वेळ येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
तर अतिरिक्त शल्यचिकित्सक मंगेश टेहरे म्हणतात की, काही दिवस डिझेल ची अडचण होती मात्र बिल दिले आहे. आता प्रश्न सुटेल.

अशी आहे रुग्णवाहिका निहाय स्थिती

MH 38, 287 - टायर बदलले नाहीत, ऑइल बदली नाही
MH 38, 286 - लाईट नाहीत, टायर बदलले नाहीत
279- चार ते पाच महिने होऊनाही अद्याप सर्व्हिसिंग नाही. वास्तविक पाहता 7 ते 8 हजार किमी चालल्यानंतर ऑइल बदली होणे गरजेचे असते मात्र 40 हजार किलोमीटर होऊनही सर्व्हिसिंग नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.