ETV Bharat / state

हिंगोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - योग

आंतरराष्ट्रीय योग दिवस योगदिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जागोजागी आयोजित केलेल्या योग शिबिरात राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हिंगोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
author img

By

Published : Jun 21, 2019, 2:26 PM IST

हिंगोली- आज जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. देशासह राज्यात विविध ठिकाणी पहाटेपासूनच योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योग गुरू योगाचे धडे देत योगाचे महत्त्वही सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही जागोजागी आयोजित केलेल्या योग शिबिरात राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हिंगोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंगोलीमध्ये मागील तीन ते चार दिवसापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी सुरू होती. विशेष म्हणजे पतंजली संघटनेच्यावतीने योग शिबिराची जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. आज पहाटे राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांनी एनटीसी परिसरातील मैदानावर गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. योग गुरूंनी योगाचे धडे देत त्याचे महत्त्व समजावून सांगितले.

एनटीसी भागात आयोजित केलेल्या योग शिबिरास भाजप आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, नगरपालिका अध्यक्ष बाबाराव बांगर, तहसीलदार गजानन शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुमोड, माजी खासदार शिवाजी माने, क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, किशोर पाठक, संजय बेतेवार, चंदा रावळकर, दत्तराव लेकुळे यांच्यासह पतंजली संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंडळींनी देखील जागतिक योग दिन साजरा केला.

Intro:आज जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. देशासह राज्यात विविध ठिकाणी पहाटेपासूनच योग शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये योग् गुरू योगाचे धडे देत योगाचे महत्व ही सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यात जागोजागी आयोजित केलेल्या योग् शिबिरात राजकिय पुढाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Body:हिंगोली येथील एनटीसी भागात आयोजित केलेल्या योग शिबिरास भाजपा आ. तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, नगरपालिका अध्यक्ष बाबाराव बांगर, तहसीलदार गजानन शिंदे, जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुमोड, माजी खा. शिवाजी माने, क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, किशोर पाठक, संजय बेतेवार, चंदा रावळकर, दत्तराव लेकुळे यांच्यासह पतंजली संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मंडळीने देखील जागतिक योग दिन साजरा केला.

Conclusion:जागतिक योग दिनाची हिंगोली मध्ये मागील तीन ते चार दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. विशेष म्हणजे योगा शिबिराची पतंजली संघटनेच्यावतीने जनजागृतीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. पहाटे- पहाटे राजकीय पुढाऱ्यांसह नागरिकांनी एन टी सी परिसरातील मैदानावर एकच गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. योग गुरुनी योगाचे धडे देत महत्त्व समजून सांगितले.

फोटो ग्रुप वर आहेत व्हिज्यु अल देतोय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.