ETV Bharat / state

दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; एक ठार - santosh bhise

हिंगोली - जिल्ह्यातील शिरडशहापूर येथून काही अंतरावर आलेल्या जिनिंगजवळ दुचाकीचा अपघात झाला.

अपघातग्रस्त दुचाकी
author img

By

Published : May 6, 2019, 11:40 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील शिरडशहापूर येथून काही अंतरावर आलेल्या जिनिंगजवळ दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये जिनिंगमध्ये काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

अर्जुन ब्राह्मदेव तोरकड(वय ३० वर्षे, रा. दुराचीवाडी जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. किरण शिवाजी इंगोले (वय २५ वर्षे, रा. पांगारा शिंदे ) हा गंभीर जखमी झाला आहे. किरण हा (एम.एच. ३८ एल. २५५०) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता तर, अर्जून हा (एम. एच. २५ ए. बी. ११७२) या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, दोन्ही दुचाकीचा समोरा-समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्जुन तोरकड हा जागीच ठार झाला. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घटनेची माहिती कळताच कुरुंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.

Intro:जिल्ह्यातील शिरडशहापूर येथुन काही अंतरावर आलेल्या जिनिंग जवळ झालेल्या दुचाकी अपघातात जिनिंग मध्ये काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज सायंकाळी सात च्या सुमारास घडली.

Body:अर्जुन ब्राह्मदेव तोरकड(३० रा. दुराचीवाडी जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. किरण शिवाजी इंगोले (२५ रा. पांगारा शिंदे ) हा गंभीर जखमी झाला आहे. किरण हा एम. ३८ एल. २५५० या दुचाकीने जात होता तर एम. एच २५ ए. बी११७२ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना, दोन्ही दुचाकीचा समोरा समोर जोराचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, अर्जुन तोरकड हा जागीच ठार झाला. या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Conclusion:घटनेची माहिती कळताच कुरुंदा पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.

घटनेचे फोटो मेल वर अपलोड केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.