ETV Bharat / state

हिंगोलीत नऊ लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सरकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या गोडाऊनचा या प्रकारे वापर होत असल्याचे संबंधित कारवाईत समोर आले आहे.

illegal tobacco seized in hingoli
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:27 PM IST

हिंगोली - अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. वसमत येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आलेल्या कारवाईत हे घबाड हाती लागले आहे. त्यामुळे सरकारी योजनेच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या गोडाऊनचा या प्रकारे वापर होत असल्याचे संबंधित कारवाईत समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत 8 लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

खालिद शेख यांच्या मालकीचे हे गोडाऊन असून ते सध्या मुझाहेद खान नशीब खान पठाण यांना भाड्याने देण्यात आले आहे. यामध्ये अनेक दिवसांपासून गुटखा साठवण्यात येत होता.
संबंधित कारवाईत 4 मार्च 2017 ला दिलेल्या आदेशान्वये हे गोडाऊन सील करण्यात आले आहे. तर अन्य कारवाईत याच ठिकाणी भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केल्यानंतर 8 हजार 140 किंमतीचा गुटखा तसेच पानमसाला आढळला. या दोन्ही करवाईमध्ये 8 लाख 43 हजार 468 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

तर दोन्ही ही कारवाईत मुझाहेद खान नसीब खान पठाण, भागवत बाबुराव मारकोळे या दोघांवर अन्न सुरक्षा तसेच भा.दं.सं कायद्यानुसार वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह-आयुक्त वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले, प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार यांनी संबंधित कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा पथकाच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:

हिंगोली- परभणी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासणीत वसमत येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग अंतर्गत असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये 8 लाख 43 हजाराचा गुटखा जप्त केलाय. त्यामुळे योजनेच्या गोडावूनचा असा ही वापर होत असल्याचे या कारवाईत समोर आलंय.
Body:
खालिद शेख यांच्या मालकीचा गोडावून आहे. या गोडावूनमध्ये मागील अनेक दिवसापासून गुटखा साठवून ठेवला जायचा याची कुणालाही माहिती मिळत नव्हती. हा गोडावून मुझाहेद खान नशीब खान पठाण याना किरयाने दिला आहे. त्या गोडावून मध्ये देखील गुटखा, पानमसाला आढळून आला. त लवकर लवकर त्यामुळे आयुक्तांच्या 4 मार्च 2017 च्या आदेशान्वये सदर गोडाऊन सील करण्यात आलाय, तर दुसऱ्या कारवाईत येथेच भागवत बाबुराव मारकोळे यांच्या घरात तपासणी केली असता, त्यांच्या घराच्या बोळीत 8 हजार 140 रुपयांचा प्रतिबंधक गुटखा, पानमसाला आढळून आला. दोन्ही ही करवाईमध्ये 8 लाख 43 हजार 468 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केलाय. Conclusion:तर दोन्ही ही कारवाईत मुझाहेद खान नसीब खान पठाण, भागवत बाबुराव मार्कोळी या दोघांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा तसेच भां.द.वी कायद्या नुसार वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. कारवाई सह सह आयुक्त वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा भोसले, प्रकाश कच्छवे, अरुण तमडवार यांनी केलीय. अन्नसुरक्षा पथकाच्या या कारवाईने हिंगोली जिल्ह्यात मात्र आता एकच खळबळ उडाली आहे या कारवाईत जिल्ह्यात चोरीछुपे घुटका विक्री सुरू असल्याचे मात्र आता उघड झाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.