ETV Bharat / state

मालकाचा निर्दयीपणा, मृत घोड्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी टाकले रस्त्याच्या कडेला

काही लोक किती मतलबी आणि निर्दयी असतात याचे चित्र एका मृत घोड्याच्या निर्दयी मालकावरून समोर आले आहे. ज्या घोड्याने आपल्या मालकाचे आयुष्यभर ओझे वाहिले, त्याच घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी या मालकाने त्याला रस्त्याच्या कडेला टाकून दिले.

मृत घोड्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी टाकले रस्त्याच्या कडेला
author img

By

Published : Jun 2, 2019, 11:05 AM IST

हिंगोली - पाळीव प्राण्यांना आपण अत्यंत प्रेमाने सांभाळतो. यावर तेही आपल्यावर अत्यंत प्रेम करू लागतात. मात्र, काही लोक किती मतलबी आणि निर्दयी असतात याचे चित्र एका मृत घोड्याच्या निर्दयी मालकावरून समोर आले आहे. ज्या घोड्याने आपल्या मालकाचे आयुष्यभर ओझे वाहिले, त्याच घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी या मालकाने त्याला रस्त्याच्या कडेला टाकून दिले.

हा घोडा जेथे टाकण्यात आला आहे, त्या परिसरात आता दुर्गंधी सुटली आहे. येथून ये-जा करणाऱ्यांना याचा अत्यंत त्रास होत आहे. याहूनही भयानक गोष्ट म्हणजे कुत्री या मृत घोड्याचे लचके तोडताना दिसत आहेत. येथे कुत्र्यांची संख्या वाढल्याने अपघात घडण्याचीही शक्यता आहे.

अश्मयुगापासून ते आजच्या प्रगत युगापर्यंत मानवाने प्रगतीचा जो काही आलेख वाढविला आहे त्या आलेखात मानवाला विविध प्राण्यांची विशेषतः पाळीव प्राण्यांची अत्यंत मदत झाली आहे. समाजशिल असलेल्या मानवाने पाळीव प्राण्यांना आपलेसे करून त्यांना लळा लावला. यातून त्याने आपल्या सुविधांसाठी त्याचा पाहिजे तसा उपयोगही करून घेतला. याच वर्षानुवर्षाच्या ऋणानुबंधनामुळे बरीचशी प्राणी माणसाळलीदेखील. यातून आपले सर्वस्व विसरून मालकाप्रती हे प्राणी निस्वार्थपणे सेवा बजावत असतात. मात्र, माणूस हा नेहमीकरिता व्यावहारिकच असतो. हे दिसून आले आहे, मृतावस्थेत हिंगोली-ओंढा रस्त्यावरील बोरजा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मृत घोड्यावरून.

मागील ४ ते ५ दिवसांपूर्वी या घोड्याचा मृत्यू झाला असावा. यासंदर्भात संबंधित विभागाने सदरील घोड्याच्या निर्दयी मालकाचा शोध घ्यावा आणि घोड्याची शेवटच्या क्षणी अशाप्रकारे हेळसांड केल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्याला मानव खरोखरच खूप वजिव्हाळा लावतोय, यावर प्राणीदेखील त्या धन्याला प्रेमापोटी थोडेही इसमत नाही. मात्र खरोखरच मानव एवढा मतलबी प्राणी आहे, हे दिसून आलंय एका मृत घोड्याच्या निर्दयी मालकवरून. ज्या घोड्याने आपल्या मालकाचे आयुष्यभर ओझे वाहून नेले, त्या घोड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याला मृतावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिलंय. रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा तर त्रास सहन करावाच लागतोय, मात्र याहूनही जास्त त्या घोड्याचे कुत्रे लचके तोडताना पाहावेनासे वाटतय. विशेष म्हणजे घोड्याचे मांस खाण्यासाठी या ठिकाणी कुत्र्याची एवढी वर्दळ वाढली आहे की कुत्रे घोड्याचे मांस खाण्यासाठी एकच घाई करीत आहेत. नेहमीच कुत्र्यांची भांडणे होत असल्याने ही की वडाळ अनेकदा रस्त्यावरही येत आहे त्यामुळे अपघात होण्याची भीती या ठिकाणी नाकारता येत नाही.

Body:अश्मयुगापासून ते आजच्या प्रगत युगापर्यंत मानवाने प्रगतीचा जो काही आलेख वाढविला आहे, त्या आलेखात मानवाला विविध प्राण्यांची विशेषतः पाळीव प्राण्यांची अतुलनिय मदत झाली. समाजशिल असलेल्या, मानवाने पाळीव प्राण्यांना आपलेसे करून, त्यांना लळा लावला, यातून त्याने आपल्या सुविधांसाठी त्याचा पाहिजे तसा उपयोगही करून घेतला. याच वर्षानुवर्षे च्या ऋणानुबंधनामुळे बरीचशी प्राणी मांसाळली देखील. यातून आपल सर्वस्व विसरून मालकाच्या प्रति हे प्राणी निस्वार्थ पणे सेवा बजावत असतात. मात्र माणूस हा नेहमीकरिता व्यवहरिकच असतो. हेच दिसून आलंय नियमित मालकांचे ओझे वाहुन नेणाऱ्या घोड्याला मृतावस्थेत हिंगोली- ओंढा रस्त्यावरील बोरजा फाटा येथे रस्त्याच्या कडेला निपचित घोड्यावरून. मागील चार ते पाच दिवसापासून या घोड्याचा मृत्यू झाला असावा, परिसरात भयंकर ददुर्गंधी पसरली आहे. कुत्रे या घोड्याचे लचके तोडताना पाहून रस्त्यावरून ये जा करणाऱ्याची मने हेलावून जात आहेत. निपचित पडलेल्या घोड्यावरून त्या निर्दयी मालकाची बेगडी वृत्ती दिसून येत आहे.

Conclusion:संबंधित विभागाने सदरील घोड्याच्या निर्दयी मालकाचा शोध लावून , घोड्याची शेवटच्या क्षणी अशाप्रकारे हेळसांड केल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याची वेळीच विल्हेवाट न लावल्यास हमखास या ठिकाणी अपघास होण्याची शक्यता आहे.

मयत घोड्याचा फोटो मेल केला आहे बातमीत वापरावा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.