ETV Bharat / state

हिंगोलीत बारा वर्षांपासून वानरांची तहान, भूक भागवणारा 'दिलदार' व्यापारी - monkey

जंगली भागातील पाणवठे पूर्ण कोरडे झाले असल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे धावत सुटले आहेत. मात्र, हिंगोलीतील बियाणी या व्यापाऱ्याचा वानरांच्या टोळीला चांगलाच लळा लागला आहे. बियाणी त्यांना रोज वेगवेगळे पदार्थ तर कधी शेंगदाणे, फुटाणे, काकड्या आदी खाऊ घालतात.

बारा वर्षांपासून वानरांची तहान भूक बागविणारा दिलदार व्यापारी
author img

By

Published : May 18, 2019, 9:22 PM IST

हिंगोली - सध्या हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. टंचाईचा सामना केवळ मानवालाच नव्हे तर वन्य प्राण्यांनाही करावा लागत आहे. यावर्षी पाणीटंचाई जास्तच भासते. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावापर्यंत धाव घेत आहेत. मात्र, हिंगोली शहरात अती वर्दळीच्या ठिकाणी चक्क बारा वर्षांपासून एक व्यापारी वानरांची तहान आणि भूक भागवत आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांचा दिलदारपणा जिल्ह्यात चांगलाच चर्चेला आला आहे.

बारा वर्षांपासून वानरांची तहान भूक बागविणारा दिलदार व्यापारी

राजेश बियाणी असे व्यापाऱ्याचे नाव असून बियाणी हे स्वतः वकील असून त्यांचा हार्डवेअरचा व्यापार आहे. ते गेल्या बारा वर्षांपासून वानरांची खाण्याची व पिण्याच्या पाण्याची अविरत सेवा करतात. मागील दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जंगली भागातील पाणवठे पूर्ण कोरडे झाले असल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे धावत सुटले आहेत. मात्र, हिंगोलीतील बियाणी या व्यापाऱ्याचा वानरांच्या टोळीला चांगलाच लळा लागला आहे. बियाणी त्यांना रोज वेगवेगळे पदार्थ तर कधी शेंगदाणे, फुटाणे, काकड्या आदी खाऊ घालतात. रोज न चुकता सायंकाळच्या वेळेस वानरांची टोळी व्यापाऱ्याचा दुकानासमोर उड्या घेतात. बियाणी यांना वानर आल्याची चाहूल लागताच ते हातात खाद्यपदार्थ घेऊन दुकानाबाहेर येतात, तोच वानरांची टोळी त्यांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. एरवी व्यक्ती बघितल्यानंतर भीतीने निघून जाणाऱ्या वांनरांचा बियाणी यांना घेराव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. दिवसेंदिवस या ठिकाणी वांनरांच्या संख्येत वाढ होत आहे.

बारा वर्षांपासून वानरांच्या सानिध्यात राहत असलेल्या बियाणी यांना वानरांचे संवादही कळू लागले आहेत. वानरांच्या वेगवेगळ्या टोळ्या एकत्र कधीच राहत नाहीत. तसेच एखाद्या वानरांचा अपघातात शरीराचा एखादा हिस्सा गमवावा लागला तर त्याला दोन्ही टोळ्या नाकारतात. त्यामुळे अशा वानरांसाठी वेगळ्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था करावी लागते.

वानरांच्या या सेवेने आत्मिक समाधान होत असल्याचे बियाणी सांगतात. तसेच एखाद्या दिवशी बाहेर गावी गेल्याने चारा देता आला नाही, तर पहाटे वानर दुकान परिसरात बियाणी यांची प्रतिक्षा करतात. वानरांची सेवा करणारा व्यापारी म्हणूनही बियाणी यांची शहरभर ओळख आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात पाणी अन चारा टंचाई असल्याने बियाणीप्रमाणेच इतरही दिलदार व्यक्तींनी वन्य प्राण्यांच्या सेवेसाठी पुढे येण्याची गरज आहे.

Intro:सध्या हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले. टंचाईचा सामना केवळ मानवालाच नव्हे तर वन्य प्राण्यांनाही करावा लागत आहे. यावर्षी जरा पाणी टंचाई जास्तच भासते. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावापर्यंत धाव घेत आहेत. मात्र हिंगोली शहरात अति वर्दळीच्या ठिकाणी चक्क बारा वर्षापासून एक व्यापारी वानरांची तहान अन भूक भगवतोय. त्यामुळे या व्यापाऱ्यांचा दिलदार पणा जिल्ह्यात चांगलाच चर्चेला आलाय.

Body:राजेश बियाणी असे व्यापाऱ्याचे नाव असून बियाणी हे स्वतः वकील असून त्यांचा हार्डवेअर चा व्यापार आहे. ते गेल्या बारा वर्षापासून वानरांची खाण्याची व पिण्याच्या पाण्याची अविरत सेवा करतात. मागील दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे जंगली भागातील पूर्ण कोरडे झाले असल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्या कडे धावत सुटले आहेत.मात्र हिंगोलीतील बियाणी या व्यापाऱ्याचा वानरांच्या टोळीला चांगलाच लळा लागलाय. बियाणी त्याना रोज वेगवेगळे पदार्थ तर कधी शेंगदाणे, फुटाणे, काकड्या आदी खाऊ घालतात. रोज न चुकता सायंकाळच्या वेळेस वानरांची टोळी व्यापाऱ्याचा दुकानासमोर उड्या घेतात. बियाणी यांना वानर आल्याची चाहूल लागताच ते हातात खाद्यपदार्थ घेऊन दुकाना बाहेर येतात तोच वानरांची टोळी त्यांना घेऊन टाकते त्यांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. एरवी व्यक्ती बघितल्यानंतर भीतीने निघून जाणाऱ्या वांनरांचा बियाणी यांना घेराव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.दिवसेंदिवस या ठिकाणी वांनरांची संख्येत वाढ होत आहे.

Conclusion:बारा वर्षांपासून वांनरांच्या सानिध्यात राहत असलेल्या बियाणी यांना वांनरांचे सवांद ही कळू लागलेत. वांनरांच्या वेगवेगळ्या टोळ्या एकत्र कधीच राहत नाहीत. तसेच एखाद्या वांनरांचा अपघातात शरीराचा एखादा हिसा गमवावा लागला तर त्याला दोन्ही टोळ्या नाकारतात. त्यामुळे अशा वांनरांसाठी वेगळ्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था करावी लागते. तर त्या वानराला पाणी देखील पिण्याची संधी अगदी शेवटी दिली जात असल्याचे दिसून येत असल्याचे व्यापारी सांगतात. वांनरांच्या या सेवेने आत्मिक समाधान होत असल्याचे बियाणी सांगतात. तसेच एखाद्या दिवशी बाहेर गावी गेल्याने चारा देता आला नाही तर पहाटे वानर दुकान परिसरात बियाणी यांची प्रतिक्षा करतात. वांनरांची सेवा करणारा व्यापारी म्हणून ही बियाणी यांची शहरभर ओळख आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात पाणी अन चारा टंचाई असल्याने बियाणी प्रमाणेच इतरही दिलदार व्यक्तीने वन्य प्राण्यांच्या सेवेसाठी पुढे येण्याची गरज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.