ETV Bharat / state

हिंगोलीत अवैध वाळूसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; गुन्हे दाखल - हिंगोली अवैध रेतीची वाहतूक

हिंगोलीच्या खानापूर भागात वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

hingoli
हिंगोली
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:22 PM IST

हिंगोली- रात्री अपरात्री वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान खानापूर चिता परिसरात मारलेल्या छाप्यात 3 ट्रॅक्टर ताब्यात घेतले. तसेच त्यातील 5 ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर असा 17 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जनार्धन ज्ञानेश्वर गंगावणे चालक रा. खेड, विश्वदीप विजय पाईकराव चालक रा. टाकळी, गजानन सुभाष गंगावणे (रा . खेड) या सर्वांनी प्रकाश रामजी कांदे, आकाश जगन्नाथ कांदे, विष्णू सीताराम कांदे यांच्या सांगण्यावरून वाळूची चोरटी वाहतूक केली. रात्री-अपरात्री या भागात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक करण्यात येत होती. हा प्रकार पेट्रोलिंग दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या लक्षात आला. पोलिसांनी वाळू सह ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यामध्ये 17 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा आरोपींविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, विलास सोनवणे, सुदाम लेकुळे, भगवान आडे पथकातील आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.