ETV Bharat / state

वाळू माफियाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाळू माफियावर कारवाई करून आरोपीकडील दोन वाहनासह एकूण ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author img

By

Published : Feb 3, 2021, 9:49 PM IST

Breaking News

हिंगोली - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची चोरट्या पद्धतीने विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे अवैधरित्या वाळूची तस्करी करून विक्री करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात येत आहे. यात आज ( ता. ३ ) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आरोपीकडील दोन वाहनासह एकूण ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बोराळा ते पांगरी या रस्त्यावरून अवैधरित्या ट्रॅक्टरने वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई करून वाहनासह वाळू साठा जप्त केला आहे. यावेळी ट्रॅक्टरचालक बंडू शंकर कामखेडे तसेच हनुमान बबन कामखेडे (रा. आमला ता. जि. हिंगोली) हे दोघे जण अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना पोलिसांना आढळून आले. तेव्हा पोलिसांनी कारवाई करून या दोघांकडून दहा हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू तसेच ट्रॅक्टर असा एकूण ११ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, राजू ठाकुर, किशोर सावंत, दीपक पाटील आदींनी केली.

हेही वाचा - व्यापारी, सर्वसामान्य अन शेतकऱ्यांचा विचार करून सादर केलेले बजेट- गजानन घुगे

हेही वाचा - हिंगोली : अट्टल मोबाईल चोरट्यास अटक, 21 मोबाईल हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.