ETV Bharat / state

हिंगोलीत बंदला कोणताही प्रतिसाद नाही; बाजारपेठांसह बस सेवा, मार्केट सुरळीत

संपूर्ण देशात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात बंद पाळला जात आहे. मात्र, या बंदला हिंगोलीत प्रतिसाद मिळाला नाही. शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आणि प्रतिष्ठाने सुरळीत सुरू होती.

hingoli-had-no-response-to-the-closed
हिंगोलीत बंदला कोणताही प्रतिसाद नाही
author img

By

Published : Jan 29, 2020, 5:05 PM IST

हिंगोली - संपूर्ण देशात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंद पाळला जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील पाच ही तालुक्यात केवळ मुस्लिम संघटनांनीच बंद पाळला.

हिंगोलीत बंदला कोणताही प्रतिसाद नाही

हिंगोली शहरातील बाजारपेठा बस सेवा आणि सर्व शासकीय कार्यालय, त्याचबरोबर शाळा महाविद्यालय सर्व काही सुरळीत सुरू होते. हिंगोलीसह पाच ही तालुक्यात व्यापाऱ्यांनी बंद पाळला नाही. नेहमी प्रमाणे, व्यापाऱ्यांनी आपली दालने सुरू ठेवल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कुठे ही बंदला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नेहमीपेक्षा आज हिंगोली शहरातील अति वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे वर्दळ काही कमी प्रमाणात दिसून आली. ग्रामीण भागातून मात्र, ग्रामस्थ शहरी भागाचा आढावा घेत होते.

कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव शहरांमध्ये बंदला अल्प प्रतिसाद असून या ठिकाणी काही प्रमाणात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. तर काही दुकाने मात्र पूर्ववत सुरू होती. आठ दिवसात दुसऱ्यांदा बंद पाळण्यात आल्याने, आजच्या बंदला मात्र तेव्हढा प्रतिसाद मिळाला नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Intro:*

बाजारपेठा आणि सर्व बस सेवा व मार्केट सुरळीत सुरू आहे

हिंगोली- संपुर्ण देशात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात बंद पाळला जातोय. त्याच धर्तीवर हिंगोलीतही जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात आलाय. मात्र जिल्ह्यातील पाच ही तालुक्यात केवळ मुस्लिम संघटनांनीच बंद पाळला जातोय.

Body:हिंगोली शहरातील बाजारपेठा बस सेवा आणि सर्व शासकीय कार्यालय, त्याचबरोबर शाळा महाविद्यालय सर्व काही सुरळीत होते. तसेच हिंगोलीसह पाच ही तालुक्यात व्यापाऱ्यांनी बंद पाळला नाही. नेहमी प्रमाणे, व्यापाऱ्यांनी आपली दालने सुरू ठेवल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कुठे ही बंदला कोणताही प्रतिसाद नाही. नेहमीपेक्षा आज हिंगोली शहरातील अति वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे वर्दळ काही प्रमाणात दिसून आलीय. तर ग्रामीण भागातून मात्र ग्रामस्थ शहरी भागाचा आढावा घेत होते. Conclusion:कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव शहरांमध्ये बंदला अल्प प्रतिसाद असून याठिकाणी काही प्रमाणात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. तर काही दुकाने मात्र पूर्ववत सुरू होती. आठ दिवसात दुसऱ्यांदा बंद पाळण्यात आल्याने, आजच्या बंदला मात्र तेव्हढा प्रतिसाद मिळाला नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.