हिंगोली - 165 वर्षाची परंपरा असलेल्या सार्वजनिक दसरा महोत्सवातील 51 फुटी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाने विजयादशमीची सांगता झाली. यावेळी रावण दहनासाठी हजारोंची उपस्थिती होती.
आकर्षक रोषणाईने रामलीला मैदान परिसर उठून दिसत होता. मागील आठ दिवसापासून सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने रावण दहनाची तयारी सुरू होती. यंदा दसरा महोत्सवाचे संपूर्ण नियोजन हे खाकी बाबा मठाकडे होते. दहनादरम्यान मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. महोत्सवासाठी आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करण्यापूर्वी आतषबाजी करण्यात येत होती.
हेही वाचा दसऱ्याच्या निमित्ताने बांबूने तयार केलेल्या रावणाच्या पुतळ्याचे दहन 1 तास फटाक्यांचे आकर्षण
तसेच रामायण कथेतील कलाकारांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यावेळी मठाधिपती कमलदास महाराज, खासदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.