ETV Bharat / state

धक्कादायक : कोरोना वार्ड परिसरात राबताहेत अल्पवयीन मुले; कालच झाला फडणवीसांचा दौरा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सामान्य जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुले कोरोना वार्ड परिसरात साफसफाई करताना आढळून आले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) जिल्हा सामान्य रुग्ण्यालयाला भेट दिली होती.

अल्पवयीन मुले
अल्पवयीन मुले
author img

By

Published : Jun 4, 2021, 5:30 PM IST

हिंगोली - दिवसेंदिवस कोरोना वार्डमधील धक्कादायक बाबी उघड होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोरोना वार्डमध्ये उघडकीस आला आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुले कोरोना वार्ड परिसरात साफसफाई करताना आढळून आले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) जिल्हा सामान्य रुग्ण्यालयाला भेट दिली होती.

कोरोना वार्ड परिसरात राबताहेत अल्पवयीन मुले

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमीच वेगवेगळ्या बाबीने चर्चेत राहत आहे. आता तर अल्पवयीन मुले येथे राबत असल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते हे गुरुवारी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी हिंगोली मध्ये दाखल होताच जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोरोना वार्डला भेट देऊन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत संवाद साधला. दरम्यान, घाई गडबडीत रुग्णालय परिसरात पडलेला कचरा उचलताना काही अल्पवयीन मूल आढळून आले. हा धक्कादायक प्रकार पाहून सर्वचजण अवाक झाले.

जिल्हा सामान्य रुग्णालय
जिल्हा सामान्य रुग्णालय

कारवाई होणार काय?

कोरोना वार्डमध्ये विविध संस्थेमार्फत रोजगार पुरवून काम केले जात आहे. कामाच्या ओघात येथे कामगाराचे वय देखील बघितले जात नसल्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या भेटी दरम्यान उघड झाले आहे. केवळ एकट्या रुग्णालय परिसरातच नव्हे तर अनेक ठिकाणी देखील अल्पवयीन कामगार राबत असतात. मात्र कामगार कार्यालय यावर कोणतीही कारवाई करत नाही. आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.