ETV Bharat / state

दहावी निकाल : गावात टॉपरपेक्षा 'या' बहाद्दराचीच चर्चा जास्त; 'हे' आहे कारण - maharastra ssc result

दहावीत कमी गुण मिळाले. मात्र, बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे.

सोपान वसंत कोरडे
author img

By

Published : Jun 9, 2019, 8:45 PM IST

हिंगोली - शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात कोणी टक्केवारीची शंभरी गाठली तर कुणी सर्वच विषयात नापास झाले. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हान येथील एका बहाद्दराने चक्क सर्वच विषयात ३५ गुण मिळवून दहावीत यश मिळविले. त्याच्या या 'कट टु कट' मिळवलेल्या गुणांनी परिसरात त्याचे कौतुक होत आहे. अनेक जण तर त्याच्या सोबत सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकत आहेत.

hfhf
निकाल

सोपान वसंत कोरडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गावापासूनच तीन किमी अंतरावर असलेल्या भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात शिक्षण घेत होता. दहावीत कमी गुण मिळाले. मात्र, बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. जास्त टक्के मिळालेल्या विद्यार्थांपेक्षा सगळ्या विषयात ३५ गुण घेणारा सोपानचा निकाल सर्वजण कुतुहलाने पाहत होते.

सोपानला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान समाजशास्त्र या सर्वच विषयात ३५ गुण मिळाले आहेत. ही बाब ग्रामस्थांना समजल्यानंतर गावातील तरुणांनी सोपानचे अभिनंदन करत जल्लोष केला. एवढेच नव्हे तर सोपानच्या या आगळ्या वेगवेगळ्या निकालाने गावाचे नाव चर्चेत आणल्याचे ग्रामस्थ सांगत होते. सोपान हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने भांडेगाव ते नवलगव्हान अशी पायपीट करून शिक्षण घेतले.

दहावीत फक्त ३५ टक्के गुण घेतले. मात्र, बारावीला यापेक्षाही चांगले गुण मिळवेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला तर एमएलटी, डीएमएलटी हा कोर्स पूर्ण करत लॅब टेक्नीशियन होण्याचा मानस सोपनने व्यक्त केला. सर्व विषयात १०० गुण मिळविणे जसे कठीण तसे सगळ्या विषयातही ३५ गुण मिळवणे ही पण एक किमया आहे.

Intro:शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला या निकालात कोणी टक्केवारीची शंभरी गाठली तर कुणी सर्वच विषयात सपशेल अपयश आलेय. मात्र हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हान येथील एका बहाददराने चक्क सर्वच विषयात 35 गुण मिळवून दहावीत यश मिळविले. त्याच्या या यशाने गावातील तरुणाईने त्याला डोक्यावर घेतले अन त्याच्या वर कॊतुकाचा वर्षाव करत अन सेल्फी घेत सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. वरून तो म्हणतोय सुद्धा की दहावीत कमी गुण मिळविले मात्र बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचं माझं स्वप्न असल्याच सांगतोय.

Body:कसोपान वसंत कोरडे असे या विध्यार्थ्यांच नाव आहे. तो गावापासूनच तीन किमी अंतर असलेल्या भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात शिक्षण घेत होता. शनिवारी निकाल जाहीर झाला सर्वत्र आप आपला निकाल मोठ्या कुतूहलाने पाहत होते अन सांगत होते. तर सोपानचा निकाल दुसरेच कुतूहलाने पाहत तेच सांगत सुटले होते. सोपानला मराठी , हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान समाजशास्त्र या सर्वच विषयात 35 गुण मिळालेत. ही बाब ग्रामस्थाना समजल्यानंतर गावातील तरुणांनी सोपानचे अभिनंदन करत जलोष केला. एवढेच नव्हे तर सोपानच्या या आगळ्या वेगवेगळ्या निकालाने गावचे नाव चांगलेच चर्चेत आणल्याचे ग्रामस्थ सांगत होते. सोपान हा शेतकरी कुटुंबातील असून त्याने भांडेगाव ते नवंलगव्हान अशी पायपीट करून शिक्षण घेतले. सोपानचे सर्वत्र कोतुक होत आहे.

Conclusion:दहावीत एवढे गुण मिळाल्याने माझे घरचे तर सर्व आनंदित आहेतच आहेत सोबतच गावतील ही तरुणाई आनंदीत आहेत. दहावीत फक्त 35 टक्के गुण घेतलेत. मात्र बारावीला या पेक्षा ही चांगले गुण मिळवेल असा. बारावीला विज्ञान शाखेत एकाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर एमएल टी, डीएमएलटी हा कोर्स पूर्ण करत लॅब टेक्नीशियन होण्याचा मानस सोपंने सांगितला. सर्वच विषयात 100 गुण मिळविणे जितके अवघड असते तितकेच काहीसे असते ते सर्वच विषयात 35 गुण मिळविणे. मात्र ही किमया साधलीय ती आता जोरदार चर्चेत असलेल्या सोपानने.

मार्क मेमो अन फोटो ftp केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.