हिंगोली- उच्चशिक्षित असलेली तरुण बेरोजगार फिरत होते. त्यांना मोठ्या प्रयत्नानंतर कुरियर वाटपाची नोकरी मिळाली. मात्र, या नोकरीचा गैरफायदा उचलत ते अट्टल दरोडेखोर बनले. त्यांनी हा सर्व खटाटोप केवळ डॉन बनण्यासाठी केल्याची घडला घडली आहे. चंद्रकांत दिनकर काककडे व नचिकेत राजकुमार वाघमारे अशी आरोपींची ( Hingoli police arrest two accused ) नावे आहेत.
कुरिअर आल्याचे सांगत दोन्ही आरोपींनी हिंगोलीमध्ये मोठा दरोडा टाकला ( Hingoli robbery case ) होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल व दोन गावठी कट्टे जप्त केले आहेत. त्याबाबत अजून तपास सुरू आहे. दोघेही उच्चशिक्षित तरुण आहेत. लवकर पैसे कमवून डॉन बनण्यासाठी त्यांनी अट्टल चोऱ्या करण्यासाठी सुरुवात केली होती.
30 डिसेंबर रोजी टाकला होता दरोडा
चंद्रकांत दिनकर काककडे ( रा. मानकेश्वर जि. परभणी ), नचिकेत राजकुमार वाघमारे ( रा. हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे ही रुममेट असून खासगी कुरिअर कंपनीत कार्यरत आहेत. यातील चंद्रकांत काकडे हा आरोपी कुरिअर वाटपाचे काम करून घरावर नजर ठेवता होता. दरम्यान, हिंगोली शहरातील बियाणी नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या अंजली कल्याणकार यांच्या घरी काकडे या आरोपीचे नेहमी ये-जा होती. या भेटीत आरोपीने घरातील सर्वच मंडळींची माहिती घेतली. नचिकेत राजकुमार वाघमारे याने कुरियर आल्याचे सांगून पिस्तुलच्या धाकावर भरदिवसा दरोडा टाकण्याची योजना ( robbery during Courier service ) आखली. त्यानुसार 30 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान, कल्याणकार यांच्या घरात पार्सल देण्याकरिता ते शिरले.
हेही वाचा-Pune Murder : लोणीकंद परिसरात बापलेकाचा खून; पोलीस आरोपींच्या शोधात
चाकूचा धाक दाखवून सर्वांना टाकले होते बांधून
दोन्ही आरोपीने दुचाकीवर येत कुरिअरचे पार्सल घेऊन, कल्याणकार यांच्या दरवाजावरील बेल वाजवली. दार उघडताच दोघेही आता शिरले. त्यांनी अंजली कल्याणकार यांचे तोंड दाबून पिस्तुलचा धाक दाखविला. अंजली यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. दरोडेखोरानी त्यांच्या हातांवर वार केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला होता.
हेही वाचा-Pune Bulli Bai Case : लहान मुली आणि महिलांचे फोटो अश्लीलरित्या वापरले, आरोपी अटकेत
एका आरोपीने केले होते मध्ये प्रदेशात पलायन
गुन्हा घडल्यानंतर हिंगोलीचे पोलीस प्रशासन आरोपींचा कसून शोध घेत होते. ग्रामीण भागातही सीसीटीव्हीची पाहणी केली जात होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोनी पंडित कच्छवे, उदय खंडेराय सपोनि बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, भाग्यश्री कांबळे, अंमलदार भगवान आडे, नितीन गोरे, किशोर कातकडे आदी यांच्या पथकाने पाठलाग करून आरोपी नचिकेत वाघमारे याला ताब्यात घेतले.
पोलिसांचे आवाहन
यापूर्वीदेखील स्वरा नगर येथे सशस्त्र दरोडा पडला होता. यातही पोलिसांनी अवघ्या 48 तासामध्ये आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. कोणत्याही पार्सलचे कुरियअर आले असता पूर्ण दरवाजा न उघडण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच गल्ली कॉलनीमध्ये सीसीटीव्ही बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे.