ETV Bharat / state

दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीत पावसाची जोरदार हजेरी - अत्यल्प पर्जन्यमान

जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी एखाद्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करित होते. मात्र, आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

जोरदार पावसामुळे शेताजवळून ओसांडून वाहणारे पाणी
author img

By

Published : Jul 2, 2019, 8:30 PM IST

हिंगोली- जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी एखाद्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करित होते. मागील पाच ते सात दिवसापासून अधून-मधून जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी पेरणी करुन घेत आहे. त्यातच आज झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेरणीला गती येण्याचे चित्र आहे.

जोरदार पावसामुळे शेताजवळून ओसांडून वाहणाऱ्या पाण्याचे दृष्य

जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. या वर्षीही मागील वर्षी सारखीच परिस्थिती असल्याने, खरिपाची पेरणी लांबणीवर गेली आहे. मृगनक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने डाळवर्गीय पिकाची पेरणी करणे शक्य नाही. आज रोजी खरिपाच्या पेरणीसाठी हिंगोली जिल्ह्याच्या २२६.८५ मिमी पावसाची अपेक्षा असताना अद्यापपर्यंत केवळ ६७.३७ मी.मी पाऊस झाला आहे. तर रविवारी केवळ ०.९२ टक्केच पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. तसेच मागील वर्षी १ जून ते १ जुलै पर्यन्त हिंगोली जिल्ह्यात २४२.४२ मी.मी पाऊस पडला होता. यंदा या महिनाभराच्या कालावधीत केवळ ६८.३० मी. मी पाऊस झाला आहे. हा पेरणीयोग्य पाउस नसल्याने काही गावातील शेतकऱयांनी शेतात नांगरणी न केल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाने केंद्रातही ग्रहकांचा दुष्काळ दिसून येत आहे.

मात्र, आज दुपारी १२ च्या सुमारस जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दहा मिनिटे सारखाच पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर व शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर सुरू असलेल्या या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी घाई करुन पेरणी केली, त्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील नदी नाल्या लगतच्या शेती खरडुन गेल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील गाळ वाहून गेल्याने त्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. एकीकडे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा अन दुसरीकडे मात्र त्याच पावसाने सर्व शेती खरडून नेली आहे. त्यामुळे पेरणीहोण्या आगोदरच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी एखाद्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करतोय. मागील पाच ते सात दिवसापासून अधून मधून जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी पेरणी करून घेत आहेत. आज झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, आता अजून काही प्रमाणात पेरणीला गती येण्याचे चित्र आहे. यंदा पावसाअभावी पेरणी केवळ 10 टक्के झालीय. जी की मागील वर्षी अध्याप पर्यन्त पेरणी आटोपली होती. यावर्षीचे चित्र उलट आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे भविष्यात पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी हळदीची लागवड करीत आहेत.

Body:हिंगोली जिल्ह्यातील सलग तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे या वर्षीही मागील वर्षी सारखीच परिस्थिती असल्याने, खरिपाची पेरणी व लांबणीवर गेलीय. मृगनक्षत्र पूर्णता कोरडे गेल्याने डाळवर्गीय पिकाची पेरणी करणे शक्य नाही. आज रोजी खरिपाच्या पेरणीसाठी हिंगोली जिल्ह्याच्या 226 .85 मिमी पावसाची अपेक्षा असताना अद्याप पर्यंत केवळ 67.37 मी पाऊस झालाय तर रविवारी केवळ 0.92 टक्के पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. तसेच मागील वर्षी 1 जून ते 1 जुलै पर्यन्त हिंगोली जिल्ह्यात 242.42 मी मी पाऊस पडला होता. यंदा तर केवळ या महिनाभराच्या कालावधीत केवळ 68. 30 मी मी पाऊस झाला आहे. अजूनही जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. काही काही गावातील शेतकऱ्यांनी तर पावसाअभावी शेतीची नांगरणी देखील केली नसल्याचे चित्र दिसून येते. पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली त्यामुळे कृषी केंद्र चालकांना शेतकऱ्याची प्रतीक्षा लागलीय.

Conclusion:आज दुपारी 12. 10वाजता हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दहा मिनिटे सारखाच पाऊस सुरू होता. नंतर काही वेळाने पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर व शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आता मात्र खऱ्या अर्थाने पेरणीला गती येणार आहे. तर दिवसभर सुरू असलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात नदी नाले दुथडी भरून वाहत होते. ज्या घाई गडबड करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील नदी नाल्या लगतच्या शेती खरडुन गेलेत. तर काही शेतकऱ्यांचे शेतीतील गाळ वाहून गेल्याने चांगलेच नुकसान झालेय. एकीकडे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा अन दुसरीकडे मात्र त्याच पावसाने सर्व शेती खरडून नेलीय. त्यामुळे पेरणी पूर्ण होण्या आडोदरच शेतीचे मोठे नुकसान झालेय.

नदी नाले दुथडी भरून वाहतानाचे व्हिज्युअल ftp केले आहेत. ते बातमी वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.