हिंगोली - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेकांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मात्र, हे करत असताना राज्यात प्लास्टिक बंदी आहे, याचा नागरिकांना विसर पडला. काहींनी प्लास्टिक वेस्टनातील पुष्पगुच्छ देऊनही गायकवाड यांचा सत्कार केला, तर काहींनी मात्र सावधानात बाळगली. एकूणच जिल्ह्यात प्लास्टिक मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना मारहाण, नसिरुद्दीन शाहांच्या मुलीवर गुन्हा दाखल
यावेळी गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात उन्नत शेतकरी समृध्दी कृषी यांत्रिकी व फलोत्पादन शेतकरी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७५ तर फलोत्पादन शेतकरी योजनेअंतर्गत २५ ट्रॅक्टरचे उद्दिष्ट होते. त्यानुसार आज ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.
हेही वाचा - ३५० चित्रपटात रांगडी भूमिका करणाऱ्या या खलनायकाला ओळखलंत का?
नवनिर्वाचित पालकमंत्री जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी आपल्या तक्रारी लिखित स्वरुपात मांडता न आल्याने बऱ्याच जणांचा हिरमोड झाला. या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात अनेत जण उपोषणाला बसले होते, त्यांच्या कितपत मागण्या पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.